घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिलं, एकनाथ शिंदेंचा फोटो देवासारखा भिंतीवर लावला!

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांचा जीव वाचवताना मृत्यू झालेले स्थानिक घोडेवाले आदिल सय्यद शाह यांच्या कुटुंबाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदतीचा हात दिला आहे.

एप्रिल 2025 मधील दहशतवादी हल्ल्यानंतर, आदिलच्या कुटुंबाला आर्थिक मदत आणि घर बांधून देण्याचे आश्वासन शिंदे यांनी पूर्ण केले असून, 10 ते 12 लाख रुपये खर्च करून नवीन घर बांधले आहे.

पहलगाम हल्ल्यात इतरांचे प्राण वाचवताना स्थानिक आदील शाहचा मृत्यू झाला होता.आदिल शाह घरातील एकमेव कमवता मुलगा होता, त्यामुळे त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता.

त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आदिल शहा यांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची तातडीची मदत आणि नवीन घर बांधून देण्याचे आश्वासन दिले होते.घर बांधून झाल्यानंतर आदिल शाह यांच्या कुटुंबीयांनी संवाद साधला. यावेळी एकनाथ शिंदेंनी दिलेलं वचन पूर्ण केलं.

कुठलीही गोष्ट कमी पडू दिली नाही. त्यांचे पदाधिकारी बाजीराव शिंदे आमच्या संपर्कात होते, अशी प्रतिक्रिया आदील शाहच्या कुटुंबीयांनी दिली आहे.घर बांधताना लागलेली मदत त्यांनी केली आम्ही त्यांचे ऋणी आहोत.

मोठा आधार त्यांनी आम्हाला दिला म्हणूनच आज घरात प्रवेश करताच त्यांचा फोटो आम्ही दर्शनीय स्थळी लावला असल्याची प्रतिक्रिया नौशाद अली सय्यद शाह यांनी दिली.

आदिल शहाच्या आई-वडिलांनी या नवीन घरात आपल्या लेकाच्या आठवणींसोबतच एकनाथ शिंदे यांचाही एक मोठा फोटो लावला आहे. आनंद नाथ सदन असं घराला नाव देण्यात आलं आहे.

आदील शाह याला जाऊन एक वर्ष पूर्ण झालं. मात्र आजही त्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही. आमच्या घरातील एकमेव कमवता आणि तरुण मुलगा शहीद झाला. मात्र त्याने लोकांचे प्राण वाचवताना स्वतः शहीद झाला याचाही अभिमान आहे, असं आदिलचे नातेवाईक म्हणाले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें