नाशिकमधील TCS धर्मांतर प्रकरणातील पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीतून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. ऑफिसमध्ये होणारा छळ, मानसिक दबाव आणि धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य केल्याचे आरोप करण्यात आले आहेत.
या प्रकरणामुळे आयटी क्षेत्रातही खळबळ उडाली आहे.शारीरिक आणि मानसिक छळाचे आरोपफिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, काही आरोपी कर्मचाऱ्यांकडून पीडितेला अपमानास्पद नावांनी हाक मारली जात होती. “झिरो फिगर” असे म्हणत तिची चेष्टा केली जात होती.
तसेच तिच्या कपड्यांशी छेडछाड करून शरीराला स्पर्श केल्याचेही आरोप आहेत. गुढीपाडव्याच्या दिवशी साडी नेसून आल्यावर पेंट्रीजवळ साडी ओढल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
अश्लील टिप्पणी करायचा
फिर्यादीत असेही नमूद आहे की, दुसऱ्या टीममधील कर्मचारी असूनही काहीजण वारंवार तिच्या जवळ येऊन बसत होते. तिच्याशी अनावश्यक जवळीक साधण्याचा प्रयत्न वाईट नजरेने पाहणे आणि अश्लील टिप्पणी करणे असे प्रकार घडत होते.
यामुळे पीडितेला कामाच्या ठिकाणी असुरक्षित वाटत असल्याचे सांगण्यात आले आहे.कामाचा दबाव आणि त्रासकाही आरोपी कर्मचाऱ्यांनी स्वतःचे काम पीडितेवर टाकून तिच्यावर दबाव आणल्याचा आरोप आहे. सतत अतिरिक्त काम देऊन मानसिक ताण निर्माण केला जात होता. त्यामुळे तिच्या कामाच्या वातावरणावर नकारात्मक परिणाम झाला.
धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप
या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे धार्मिक भावना दुखावल्याचे आरोप. फिर्यादीत म्हटले आहे की, काही आरोपी हिंदू देवी-देवतांबद्दल तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करत होते. तसेच, पीडितेला धर्म बदलण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला गेला, असा आरोपही करण्यात आला आहे.
वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप
पीडितेच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही चर्चा करत तिला “काळी जादू” करण्याचा सल्ला दिल्याचा आरोप आहे. यामुळे तिच्यावर मानसिक दबाव आणला जात असल्याचे स्पष्ट होते.जबरदस्तीने धार्मिक कृतीचा आरोपफिर्यादीत २०२३ मधील रमजान ईदच्या घटनेचाही उल्लेख आहे.
त्यावेळी एका आरोपीने तिला जबरदस्तीने घरी नेले आणि तिच्या डोक्यावर धार्मिक टोपी घातल्याचा आरोप आहे. तसेच, “आमच्या धर्मात ये, तुझे वडील बरे होतील” असे सांगत धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
या गंभीर आरोपांनंतर पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. कार्यस्थळी महिलांच्या सुरक्षिततेबाबत आणि धार्मिक स्वातंत्र्याबाबत हे प्रकरण अत्यंत संवेदनशील मानले जात असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.












