घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

विरोधक सीरिअल लायर, त्यांच्या मानसिकतेविरुद्ध.; फडणवीसांचे टीकास्र

नारी शक्ती वंदन विधेयक म्हणजे महिला आरक्षण विधेयक एनडीए सरकारने संसदेत आणले होते. मात्र विधेयक मंजूर करण्याकरता लागणारे दोन तृतीयांश मते एनडीए सरकारला जमावता आली नाही. त्यामुळे हे विधेयक नामंजूर झाले.

त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करत असून महाराष्ट्रातही राजकारण तापलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर टीका केली आहे.देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज युवाशक्ती जागर यात्रेचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारताच्या संसदेत महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या विरोधी पक्षांनी केली आहे. त्यामुळे त्याचाही जागर करण्याची आवश्यकता आहे. कारण विरोधक सीरिअल लायर आहेत. ते रोज खोटं बोलतात. 2023 ला विधेयक आलं आणि ते पारित झालं. ते विधेयक कधी लागू केलं पाहिजे, त्याचं संविधान संशोधन आलं होतं.

2023 मध्ये विधेयकाला तोंड दाबून पाठिंबा दिला होता. पण त्यांच्या आता लक्षात आलं की, एनडीएकडे दोन तृतीयांशी संख्याबळ नाही, त्यामुळे त्यांनी त्यांचे खरे दात दाखवले. असे करून विरोधी पक्षांनी संपूर्ण भारतातील नारी शक्तीचा आणि लोकशाहीचा अपमान करण्याचं काम केलं आहे. त्यामुळे याचा जागर गरजेचा आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.

लोकसभेत महिला आरक्षण येऊ नये असा विरोधकांचा प्रयत्नदेवेंद्र फडणवीस म्हणाले की, विरोधक रोज खोटं बोलतात. सीमांकन आणि जनगणनेबद्दल खोटं बोल जात आहे. या विधेयकाबाबतची वस्तुस्थिती आणि संविधानाने टाकलेली जबाबदारी काय आहे, हे सभागृहात अमित शहा यांनी स्पष्ट केले होते.

तसेच विरोधकांनी काही सुधारणा सांगितल्या होत्या, त्या सुधारणाही एक तासात करण्याचा शब्द दिला होता. पण त्यांना (विरोधकांना) महिलांना आरक्षण द्यायचे नाही. लोकसभेत महिला आरक्षण येऊ नये, असा त्यांचा प्रयत्न आहे.

परंतु या भारतात ज्या लोकांनी महिलांना सहभागिता देण्याबद्दल कार्य केले आहे, त्या सर्वांना स्मरून सांगतो की, तुमच्या या मानसिकतेविरुद्ध आमचा लढा सुरू झाला आहे. जोपर्यंत भारताच्या संसदेत आणि विधानसभेत महिलांना 33 टक्के आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत तुम्हाला (विरोधक) झोपू देणार नाही.

तुमच्या विरुद्ध आमचा संघर्ष सुरूच राहिल. मी याठिकाणी विश्वासाने सांगतो की, तुम्ही खोटं बोललात तरी “झूठ की उम्र कभी बड़ी नहीं होती और सच कभी समाप्त नहीं होता.” सत्य कधी संपणार नाही, हेच मी सांगू इच्छितो, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें