घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

शाहू चौकातील श्री म्हसोबा महाराज उत्सव दिमाखात साजरा

पुणे : शाहू चौकाचे ग्रामदैवत असलेले श्री म्हसोबा मंदिर हे शिवकालीन असून छत्रपती शिवाजी महाराज या मार्गाने जात असताना मंदिर परिसरात थांबून विश्रांती घेत असत, अशी नोंद महापालिकेत आढळते. सुमारे २०० वर्षांची परंपरा लाभलेले हे मंदिर आजही भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही चैत्र अमावस्येनिमित्त श्री म्हसोबा महाराजांचा उत्सव पारंपरिक व दिमाखदार पद्धतीने साजरा करण्यात आला. पारंपरिक वाद्यांच्या गजरात देवाची छबीना (मिरवणूक) काढण्यात आली.

या मिरवणुकीत पुणे जिल्ह्यातील विविध ढोल-लेझीम पथकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून वातावरण भक्तिमय केले.राजर्षी शाहू चौकातील ग्रामदैवत श्री म्हसोबा महाराजांच्या उत्सवानिमित्त विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

राज्याचे कॅबिनेट मंत्री मा. ना. चंद्रकांतदादा पाटील, कसब्याचे आमदार मा. हेमंतभाऊ रासने, स्थायी समितीचे अध्यक्ष मा. श्रीनाथजी भिमाले, पीएमपीएमएलचे संचालक तथा नगरसेवक मा. अजयजी खेडेकर, स्थायी समिती सदस्य मा. विशालजी धनवडे, नगरसेवक मा. राघवेंद्र बाप्पू मानकर, नगरसेवक मा. कुणालजी टिळक, नगरसेविका मा. स्वरदा ताई बापट, नगरसेविका मा. स्वप्नाली ताई पंडित, नगरसेविका मा. स्नेहाताई माळवदे, स्वीकृत नगरसेवक मा. राजेंद्रजी काकडे, सासवडचे माजी नगराध्यक्ष वामन तात्या जगताप, सामाजिक कार्यकर्ते मा. रोहिदास बापू चोरगे, मनसे नेते मा. गणेशजी भोकरे, तसेच उत्सव समितीचे अध्यक्ष मा. बाळासाहेब जगताप व उपाध्यक्ष मा. बाळासाहेब कांदे यांच्यासह समस्त भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उत्सव समितीच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. उत्सवानिमित्त परिसरात भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले असून भाविकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें