घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

लग्नाचे आमिष, अत्याचार आणि व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल — बिबवेवाडीत आरोपीला तात्काळ अटक

सदरबाबत अधिक माहिती अशी की, बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. ८२/२०२६, भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ६४,६५,३५६ (२) सह बालकांचे लैंगीक अपराधांपासुन संरक्षण अघि. २०१२ चे कलम ४ मधील निर्भया यांनी तक्रार दिली की, “आरोपी अमोल सिदधू कांबळे वय २६ वर्ष रा. जागडे नगर, आई माता मंदीर, बिबवेवाडी, पुणे याने त्याचे लग्न झालेले असताना फिर्यादी निर्भया यांचेसोबत प्रेमाचे नाटक करुन, लग्न करण्याचे आमीष दाखवुन, त्याच्या अॅटोमध्ये आशापुरामाता मंदीराच्या पाठीमागील झाडीमध्ये घेवुन जावुन अॅटोमध्ये निर्भया यांचेशी जबरदस्तीने दोन वेळेस शारिरीक संबंध ठेवून निर्भया यांना न समजू देता व्हिडीओ काढला.

तसेच विधीसंघर्षीत बालकाने गंगाधाम पेट्रोल पंपावर निर्भया यांचे लहाण भावाला इतर लोकासमोर तुझ्या बहीणीचा व अमोल कांबळेचा व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली म्हणुन निर्भया यांनी आरोपी अमोल सिदधू कांबळे व विधीसंघर्षीत बालकाविरुध्द कायदेशीर तक्रार दिल्याने वरिलप्रमाणे गुन्हा दाखल आहे.”

सदरची माहिती प्राप्त होताच सदर घटनेची गांभीर्याने दखल घेत मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक साो. यांचे आदेशाने व सुचनांप्रमाणे तपास पथक अधिकारी मालोजी कांबळे, पोलीस अंमलदार पोहवा. संजय गायकवाड, पोशि सुमित ताकपेरे, पोशि रक्षित काळे यांनी लागलीच आरोपी अमोल सिदधू कांबळे, वय २६ वर्ष, रा. जागडे नगर, आई माता मंदीर, बिबवेवाडी, पुणे व विधीसंघर्षीत बालक यांना ताब्यात घेवून सदर घटनेची अधिक माहिती घेता आरोपी अमोल सिदधू कांबळे याने गुन्हा केलेचे कबुल केले.

विधीसंघर्षीत बालकाने निर्भया यांचे भावास निर्भया व आरोपी यांचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिलेबाबत सांगितेलेने सदर आरोपी यास दाखल गुन्ह्यात अटक करून त्याची प्रथम पोलीस कस्टडी व नंतर मॅजि. कस्टडिची रिमांड मंजूर करून आरोपीस येरवडा कारागृह येथे जमा करणेत आले आहे.

तसेच विधीसंघर्षीत बालकास योग्य त्या सुचना देवून नातेवाईकांच्या ताब्यात देणेत आले आहे. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सहा. पोलीस उपनिरीक्षक विद्या सावंत करत आहेत.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार साो, सह. पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उप आयुक्त मिलिंद मोहिते, परिमंडळ २ पुणे शहर, सहा. पोलीस आयुक्त राहूल आवारे, भारती विद्यापीठ विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरज बेंद्रे, सहा. पोलीस निरीक्षक विद्या सावंत, तपास पथक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक मालोजी कांबळे, पोलीस हवालदार संजय गायकवाड, विनोद जाधव, विशाल जाधव, पोलीस अमंलदार सुमित ताकपेरे, रक्षित काळे, शिवाजी येवले, ज्योतिष काळे, दत्ता शेंद्रे यांनी केली आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें