घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

संतोष नगर, भगवा चौक येथे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

नागरिकांच्या समस्यांसाठी आता एकच ठिकाणकात्रज परिसरातील संतोष नगर, भगवा चौक येथे नगरसेविका प्रतिभाताई बापू चोरगे यांच्या पुढाकारातून जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

या कार्यालयामुळे परिसरातील नागरिकांना त्यांच्या दैनंदिन समस्यांसाठी आता एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.या उद्घाटन सोहळ्यास आमदार भीमराव अण्णा तापकीर, रोहिदास बापू चोरगे, शेतकरी संघटना अध्यक्ष सोपान चोरगे, अखिल नायर, राकेश वेताळ, सुरेखाताई मेंढे, संजय कपिले, आकाश डावरे, महेश किवडे, मायाताई खलसे, अमृतताई टोमके तसेच भाजपचे अनेक पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवून या उपक्रमाचे स्वागत केले.या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून संतोष नगर परिसरातील लाईट, पाणीपुरवठा, ड्रेनेज, रस्ते आणि वाढता ट्रॅफिक यांसारख्या महत्त्वाच्या समस्या सोडवण्यावर भर दिला जाणार आहे.

अनेक वेळा नागरिकांना त्यांच्या तक्रारी मांडण्यासाठी योग्य जागा मिळत नाही किंवा त्यांचे प्रश्न वेळेत सोडवले जात नाहीत. हीच गरज ओळखून हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे.

नगरसेविका प्रतिभाताई बापू चोरगे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “जनतेच्या सेवेसाठी आणि त्यांच्या अडचणी तत्काळ सोडवण्यासाठी हे जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे. प्रत्येक नागरिकाचा प्रश्न आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. संतोष नगरमधील नागरिकांना कोणत्याही समस्येसाठी आता भटकंती करावी लागणार नाही.”

कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनीही या उपक्रमाचे कौतुक करत, स्थानिक पातळीवर असे कार्यालय सुरू होणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

नागरिकांच्या थेट संपर्कात राहून काम केल्यास विकासाची गती वाढते आणि प्रशासनावरचा विश्वास अधिक दृढ होतो, असेही त्यांनी नमूद केले.

या कार्यालयामुळे संतोष नगर परिसरातील नागरिकांना त्यांच्या समस्या थेट मांडण्याची संधी मिळणार असून, त्यावर जलद आणि प्रभावी कार्यवाही होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें