घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

धोम येथे विविध उपक्रमांनी शिवजयंती उत्साहात साजरी

(वाई प्रतिनिधी प्रशांत थोरवे)

दि ग्रेट मराठा मंडळ, धोम (ता. वाई, जि. सातारा) यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार अत्यंत उत्साहात व दिमाखदार वातावरणात साजरी करण्यात आली. संपूर्ण गाव ‘जय शिवराय’च्या घोषणांनी दुमदुमून गेले होते. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि देशभक्तीपर उपक्रमांच्या माध्यमातून शिवजयंतीला विशेष रंगत प्राप्त झाली.कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. या पूजन सोहळ्यास वाई–खंडाळा–महाबळेश्वरचे युवा नेते मा. विकास अण्णा शिंदे, महाराष्ट्र राज्य सहाय्यक कर आयुक्त कु. श्रद्धा मराठे, तंटामुक्ती अध्यक्ष श्री महादेव आप्पा गायकवाड, वाई तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक रामदास शेठ पोळ, सामाजिक कार्यकर्ते अशोक आप्पा मराठी, नरसिंह हायस्कूल धोमचे राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शिक्षक श्री कृष्णा कांबळे, युवा नेते पैलवान सोहम पोळ आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी धोम गावाची कन्या कु. श्रद्धा मराठे हिची महाराष्ट्र राज्य सहाय्यक कर आयुक्त पदावर निवड झाल्याबद्दल जाहीर सत्कार करण्यात आला. तिच्या या यशामुळे गावकऱ्यांनी अभिमान व्यक्त करत तिचे कौतुक केले. तसेच कु. आरोही प्रशांत पोळ हिची सैनिक स्कूल व नवोदय विद्यालयासाठी निवड झाल्याबद्दल तिचाही सत्कार करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.समारंभात बोलताना राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शिक्षक श्री कृष्णा कांबळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, शिवाजी महाराजांनी १८ पगड जातींना एकत्र करून स्वराज्य उभे केले, तसेच स्त्रियांच्या सन्मानाचे रक्षण केले. त्यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग सांगत त्यांनी उपस्थितांना इतिहासाची जाणीव करून दिली. “जगावे तर शिवरायांसारखे आणि मरावे तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांसारखे,” असे प्रभावी प्रतिपादन त्यांनी केले.मा. विकास अण्णा शिंदे यांनी आपल्या मनोगतात गावाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. त्यांनी धोम गावाला ‘ब वर्ग’ दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. तसेच पुढील शिवजयंतीपूर्वी कृष्णा नदीतील जलपर्णी काढून परिसर स्वच्छ व सुंदर करण्याचा शब्द दिला.शिवजयंती निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांचीही विशेष रेलचेल पाहायला मिळाली. श्री गणेश फरांदे यांच्या ‘श्री डान्स अकॅडमी, वाई’ यांच्या वतीने “महाराष्ट्राची लोकधारा” हा रंगतदार कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमात लावणी, पोवाडे, लोकनृत्य अशा विविध सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली. स्थानिक कलाकारांच्या दमदार सादरीकरणाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.या कार्यक्रमास सातारा जिल्हा बँड बँजो असोसिएशनचे अध्यक्ष श्री सचिन दादा वायदंडे, शिवराज पोळ, अमोल पोळ, योगेश पोळ, रुपेश देशमाने, रुपेश पोळ, प्रदीप पोळ, रमेश पोळ, क्षितिज पोळ तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिवजयंतीनिमित्त संपूर्ण आठवडाभर विविध स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, खेळांच्या स्पर्धा तसेच महिलांसाठी विशेष उपक्रम घेण्यात आले. या स्पर्धांना विद्यार्थ्यांबरोबरच महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामुळे गावातील सुप्त कलागुणांना वाव मिळाला.संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन दि ग्रेट मराठा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन धोम हायस्कूलचे शिक्षक श्री कृष्णा कांबळे यांनी केले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें