घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

जिद्द, मेहनत आणि कला… सुनिल वाशिवले यांचा काठमांडूतील सुवर्ण विजयरियलस्टिक टॅटू कॅटेगरीत भारत नंबर 1 – सुनिल वाशिवले चमकले आंतरराष्ट्रीय स्तरावर

( वाई प्रतिनिधी प्रशांत थोरवे )

वाई, दि. ५ :
नवी मुंबई येथील डॉट लाईन टॅटू स्टुडिओने आंतरराष्ट्रीय स्तरावर भरीव यश संपादन करत भारताचे नाव अभिमानाने उंचावले आहे. नेपाळमधील काठमांडू येथे दि. १० एप्रिल ते १२ एप्रिल २०२६ दरम्यान पार पडलेल्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय टॅटू कन्व्हेन्शनमध्ये स्टुडिओचे कुशल आणि अनुभवी आर्टिस्ट, वाशिवली (ता. वाई) येथील सुपुत्र सुनिल विष्णू वाशिवले यांनी दिमाखदार कामगिरी करत सुवर्ण यश मिळवले.
या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जगभरातील निवडक आणि नामांकित टॅटू आर्टिस्टनाच संधी दिली जाते. त्यामुळे या स्पर्धेचे महत्त्व विशेष अधोरेखित होते. विविध देशांतील सुमारे १५० हून अधिक प्रतिभावान आर्टिस्ट्सनी आपल्या कलेचे सादरीकरण करत स्पर्धा अत्यंत चुरशीची केली.
अशा कठीण आणि उच्च दर्जाच्या स्पर्धेत सुनिल वाशिवले यांनी ‘रियलस्टिक टॅटू’ (पूर्ण बाही) या गटात प्रथम क्रमांक पटकावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या टॅटूमधील बारकावे, वास्तवदर्शीपणा, रंगसंगती आणि कलात्मक सादरीकरण यामुळे परीक्षक मंत्रमुग्ध झाले. या यशामुळे त्यांनी केवळ स्वतःचीच नव्हे, तर भारतातील टॅटू कलेचीही जागतिक स्तरावर प्रभावी ओळख निर्माण केली.
विशेष म्हणजे, भारतातून प्रथमच डॉट लाईन टॅटू स्टुडिओला या प्रकारचा मानाचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने हा क्षण अधिक अभिमानास्पद ठरला आहे. स्टुडिओने आजपर्यंत ३० हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले असून गुणवत्ता, सर्जनशीलता आणि उत्कृष्टतेच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
सुनिल वाशिवले यांचा हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. ग्रामीण भागातून येऊन, मर्यादित साधनसामग्रीतून त्यांनी आपल्या कलेला धार दिली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःचे स्थान निर्माण केले. त्यांच्या यशामागे सातत्यपूर्ण मेहनत, नवनवीन तंत्र शिकण्याची जिद्द आणि कलेप्रती असलेली निष्ठा हे महत्त्वाचे घटक आहेत.
त्यांच्या या यशामुळे अनेक तरुणांना आपल्या कौशल्याच्या बळावर मोठे यश मिळवण्याची प्रेरणा मिळत आहे. सुनिल वाशिवले यांचा हा सुवर्ण विजय भारतीय टॅटू कलेच्या इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा ठरत आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें