घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

*सर्वांच्या संमतीनेच राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा निर्णय

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री कै. अजित पवार यांनी सहा-सात महिन्यांपूर्वीच मांडला होता. त्यानंतर दोन्ही गटांतील प्रमुख नेत्यांशी चर्चा करून सर्वांना विश्वासात घेण्यात आले.

अखेर १७ जानेवारी रोजी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत विलीनीकरणासंदर्भात सविस्तर चर्चा झाली असून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका झाल्यानंतर १७ फेब्रुवारीला विलीनीकरणाची अधिकृत घोषणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.

डॉ. कोल्हे म्हणाले, अजित पवार यांनी मांडलेल्या विलीनीकरणाच्या प्रस्तावानंतर त्यांनी स्वतः आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी दोन्ही गटांतील नेत्यांशी संवाद साधला. त्यानंतर झालेल्या बैठकीत पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुका एकत्र लढवण्याचा निर्णय झाला. त्यानुसार जागावाटप करून निवडणुकादेखील एकत्रितपणे लढवण्यात आल्या. सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकाही बहुतांश ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र लढवत आहेत.

बारामती येथे १७ जानेवारीला झालेल्या बैठकीत माझ्यासह जयंत पाटील, राजेश टोपे, हर्षवर्धन पाटील, शशिकांत शिंदे आणि रोहित पवार उपस्थित होते. या बैठकीत अजित पवार यांनी विलीनीकरणाबाबतची संपूर्ण माहिती शरद पवार यांना दिली. दोन्ही गटांतील नेत्यांची संमती असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावर शरद पवार यांनी सकारात्मक भूमिका दर्शवली. त्यामुळे निवडणुका पूर्ण झाल्यानंतर १७ फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची घोषणा करण्याचा निर्णय झाल्याचे डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें