वाई : दि. 22 पाटील हॉस्पिटल (मॅटर्निटी होम व जनरल हॉस्पिटल), सोनगीरवाडी, वाई यांच्या वतीने महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पाटील हॉस्पिटलच्या १०व्या वर्धापनदिनानिमित्त तसेच महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
हे आरोग्य शिबीर शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सह्याद्री मल्टीपर्पज हॉल, पाचवड येथे हे शिबिर होणार आहे.
या आरोग्य शिबिरास महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद पाटील तसेच खासदार नितीन काका पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. त्यामुळे या शिबिराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
शिबिरामध्ये महिलांच्या विविध आरोग्यविषयक समस्यांवर मार्गदर्शन व उपचार, विवाहपूर्व तपासणी, प्रसूतीविषयक तपासणी व मार्गदर्शन, नॉर्मल डिलिव्हरी, सिझेरियन व कुटुंब नियोजन, गर्भाशयाच्या गाठी तसेच विविध स्त्रीरोगांवरील उपचारांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
तसेच वंध्यत्व निवारण, किशोरवयीन मुलींच्या लैंगिक समस्यांबाबत मार्गदर्शन, तांबी बसविण्याची सुविधा, गर्भाशयाच्या गाठी काढणे तसेच गर्भाशय न काढता करता येणाऱ्या उपचारांबाबत योग्य सल्ला दिला जाणार आहे. प्रसूतीपूर्व तपासणी, जनरल फिजिशियन सेवा आणि अत्याधुनिक लॅबोरेटरी व मेडिकल सुविधांचाही लाभ महिलांना मिळणार आहे.
या शिबिरामध्ये डॉ. अजय पाटील (MBBS, DGO – स्त्रीरोगतज्ज्ञ) यांच्यासह पाटील हॉस्पिटलचे वैद्यकीय पथक महिलांना मार्गदर्शन करणार आहे.
महिलांनी या विशेष आरोग्य शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन पाटील हॉस्पिटल आणि काळ भैरवनाथ मेडिकल यांच्या वतीने करण्यात आले आहे.










