घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

राजगड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शप) कडून राष्ट्रवादी काँग्रेस (अप) गटाला अधिकृत पाठींबा

येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजगड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) यांनी आपली अधिकृत भूमिका स्पष्ट करत अजित पवार गटाला अधिकृत पाठींबा जाहीर केला आहे. हा निर्णय पक्षाच्या संघटनात्मक धोरणानुसार व वरिष्ठ नेतृत्वाच्या सूचनेनुसार घेण्यात आला असून, याबाबत सध्या सुरू असलेल्या अफवा, संभ्रम व अपप्रचाराशी पक्षाचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजयराव कोलते तसेच महिला जिल्हाध्यक्ष भारतीताई शेवाळे यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला असून, राजगड तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या अधिकृत भूमिकेवर ठाम राहावे, असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

अफवा व अपप्रचाराला पूर्णविरामसध्या राजगड तालुक्यात या पाठींब्याच्या संदर्भात विविध प्रकारच्या अफवा, चुकीची माहिती व वैयक्तिक मतप्रदर्शन सोशल मिडिया व स्थानिक पातळीवर पसरवले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यावर स्पष्टीकरण देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) यांनी स्पष्ट केले आहे की,पक्षाच्या अधिकृत निर्णयाविरोधात कोणीही व्यक्त करत असलेले मत हे त्यांचे वैयक्तिक मत असून त्याचा पक्षाशी कोणताही संबंध नाही.

पक्षाची शिस्त, संघटनात्मक बांधिलकी आणि वरिष्ठ नेतृत्वाच्या सूचनांनुसारच निर्णय घेतले जातात. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता, पक्षाची अधिकृत भूमिका जनतेपर्यंत पोहोचवावी, असेही स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.

विकासाभिमुख निर्णयराजगड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये लोकशाही मूल्ये जपून, विकासाभिमुख धोरणांना बळ देण्यासाठी हा अधिकृत पाठींबा देण्यात आला असल्याचे पक्ष नेतृत्वाकडून सांगण्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्थैर्य, समन्वय आणि विकासकेंद्रित कामकाजाला चालना मिळावी, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.

पक्ष शिस्त महत्त्वाचीया संदर्भात पक्षाच्या वतीने असेही स्पष्ट करण्यात आले आहे की,कोणतीही दिशाभूल करणारी चर्चा, गैरसमज निर्माण करणारे संदेश किंवा अपप्रचार सहन केला जाणार नाही. पक्षाची अधिकृत भूमिका हीच अंतिम असून, सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकसंघपणे त्या निर्णयामागे उभे राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे, ही माहिती ऍड. दुर्गा चोरघे,युवती जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट)यांच्या वतीने देण्यात आली आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें