घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

*भारतीय बॉल बॅडमिंटन संघात सासवडच्या स्वराची निवड

सासवड (ता. पुरंदर) येथील उदयोन्मुख बॉल बॅडमिंटन खेळाडू स्वरा योगेश इनामके हिची मालदीव येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.

या निवडीमुळे सासवड शहरासह संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.स्वराने सातवीपासून सासवड येथील म. ए. सो. वाघिरे विद्यालय येथून बॉल बॅडमिंटन खेळाची वाटचाल सुरू केली.

सुरुवातीपासूनच तिच्या खेळातील सातत्य, मेहनत आणि जिद्द लक्षवेधी ठरली. तिला हिरामण सहारे, संजय महाजन आणि मयूर जांभळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराने आपल्या खेळात सातत्याने प्रगती साधत राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली.आतापर्यंत स्वराने तीन वेळा राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला असून, तिच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल तिला दोन वेळा ‘बेस्ट अपकमिंग प्लेयर’ या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

सध्या स्वरा वाघिरे विद्यालयात इयत्ता दहावीत शिक्षण घेत असून, सासवड बॉल बॅडमिंटन क्लबमध्ये ती नियमित सराव करते.आपल्या या यशाबद्दल बोलताना स्वराने याचे श्रेय प्रशिक्षक, कुटुंबीय, तसेच महाराष्ट्र बॉल बॅडमिंटन संघटनेचे सचिव अतुल इंगळे आणि पुणे जिल्हा बॉल बॅडमिंटन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहे.

त्यांच्या सततच्या पाठबळामुळे आणि प्रेरणेमुळेच हे यश मिळाल्याचे तिने सांगितले.स्वराच्या या ऐतिहासिक निवडीमुळे सासवड परिसरातून तिच्यावर शिक्षक, क्रीडाप्रेमी, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, भविष्यात ती आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उज्ज्वल करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें