घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

*पुण्यात शरद पवारांनी शोधली प्रशांत जगतापांची रिप्लेसमेंट

महापालिका निवडणुकीच्या गदारोळामध्येच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने संघटनात्मक नियुक्‍त्या जाहीर केल्या आहेत. माजी नगरसेवक श्रीकांत पाटील यांची पक्षाने प्रभारी शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती जाहीर केली.

तर, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे यांच्यावर पुणे महापालिका निवडणूक समन्वयपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.महापालिका निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासमवेत जाण्यास विरोध दर्शविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शहराध्यक्षपदाचा प्रशांत जगताप यांनी 24 डिसेंबर रोजी तडकाफडकी राजीनामा दिला होता. त्यामुळे पक्षाचे शहराध्यक्षपद रिक्त होते.

माजी खासदार वंदना चव्हाण, माजी महापौर अंकुश काकडे व स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे यांच्याकडून मागील काही दिवसांपासून महापालिका निवडणुकीतील पक्षाच्या कामकाजाचे संयुक्तपणे नियोजन केले जात होते.

दरम्यान, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सोमवारी पाटील यांची प्रभारी शहराध्यक्षपदी, तर तांबे यांची महापालिका निवडणूक समन्वयपदी नियुक्ती जाहीर केली. चव्हाण यांच्या उपस्थितीत पाटील यांनी कार्यभार स्विकारला.

यावेळी पक्षाचे नेते भगवानराव साळुंखे, औदुंबर खुने पाटील, स्वाती पोकळे, शशिकांत तापकीर, संजय गाडे, मनाली भिलारे, अजिंक्‍य पालकर, अमोघ ढमाले, रोहन पायगुडे आदी उपस्थित होते. महापालिका निवडणुकीमध्ये उमेदवारी न मिळाल्यामुळे कार्यकर्ते नाराज आहे, त्यांची नाराजी दूर करून त्यांना पक्षामध्ये पुन्हा सक्रिय करण्यास प्राधान्य देणार असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें