घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

*पुण्यात तरुण महिलेचा खून,पती अटकेत

महिलेचा खून केल्याप्रकरणी खडक पोलिसांकडून पतीसह तिघांना अटक करण्यात आली. भवानी पेठेत ही घटना घडली होती. वैष्णवी उर्फ वर्षा तुषार तुपसौंदर्य (२३) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

याप्रकरणी पती तुषार ऊर्फ गणेश विलास तुुपसौंदर्य (२८), मनोज रोहिदास कांबळे (३९), वनिता मनोज कांबळे (३२) यांना अटक करण्यात आली. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक अनिता तोंडे यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, तुषार रिक्षाचालक आहे. २८ जानेवारी रोजी त्याच्या कौटुंबिक कारणावरून वैष्णवीशी वाद झाला होता, वैष्णवीला त्याने बेदम मारहाण केली होती. तिला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी रुग्णालयातील डाॅक्टरांना त्याने खोटी माहिती दिली होती.

या घटनेनंतर तुषारने घटनास्थळावरील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणात पतीसह तिघांना अटक करण्यात आली. तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने तिघांना ७ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पुढील तपास गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक शर्मिला सुतार करीत आहेत.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें