घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

*धक्कादायक बुधवार पेठेतील बांगलादेशी तरुणीची पोलिसांकडून ‘पाठराखण’

बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या एका बांगलादेशी तरुणीवर कारवाई न करणाऱ्या फरासखाना पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदाराला निलंबित करण्याचेा आदेश परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले यांनी दिले.

बांगलादेशी तरुणीबाबतची माहिती मिळाल्यानंतर याबाबतची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिली नाही, तसेच तरुणीकडून पैसे घेतल्याचा आरोप महिला पोलीस हवालदारावर ठेवण्यात आला आहे.मनिषा पुकाळे असे निलंबीत करण्यात आलेल्या महिला पोलीस हवालदाराचे नाव आहे. पुकाळे फरासखाना पोलीस ठाण्यातील तपास पथकात नियुक्तीस आहेत. परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त कृषीकेश रावले यांनी शुक्रवारी रात्री याबाबतचे दिले आहेत. शहरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवरिुद्ध कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना दिले आहेत. देशभऱात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश वर्षभरापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले होते. त्यानंतर बांगलादेशी नागरिकांविरुद्ध कारवाई तीव्र करण्यात आली.

बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत २०२३ मध्ये बांगलादेशी तरुणी दलालामार्फत आली होती. त्या वेळी ती अल्पवयीन होती. वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्या प्रकरणी तरुणीने फरासखाना पोलीस ठाण्यात नुकतीच फिर्याद दिली होती.

तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, दलाल, कुंटणखाना मालकासह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल करण्यापूर्वी बांगलादेशी तरुणी पोलीस हवालदार मनीषा पुकाळे यांनी भेटली होती. याबाबतची मााहिती पुकाळे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना देणे गरजेचे होते.

मात्र, पुकाळे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली नाही. त्यांनी तरुणीकडून पैसे घेतले होते. कायद्यानुसार बेकायदा वास्तव्य केल्या प्रकरणी तक्रारदार बांगलादेशी तरुणीविरुद्ध कारवाई करणे गरजेचे होते. मात्र, पुकाळे यांनी ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून लपवून ठेवली होती.बुधवार पेठेतील सामाजिक कार्यकर्त्यांनी ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. या प्रकरणात गुन्हा दाखळ झाल्यानंतर बांगलादेशी तरुणीची चौकशी करण्यात आली. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.

वेश्यावस्तीत बांगलादेशी तरुणीतक्रारदार बांगलादेशी तरुणी १५ वर्षांची असताना तिला २०२३ मध्ये दलालाने तिला सीमा पार करुन कोलकात्यात आणले. तेथे काही दिवस तिला ठेवण्यात आले. त्यानंतर दलालाने तिला बुधवार पेठेतील वेश्यावस्तीतील कुंटणखान्यात आणले. दलालाने कुंटणखाना मालकिणीकडे तिला सोपविले. पाच लाख रुपयांना विकत घेतले आहे.

‘दहा लाख रुपये दिल्याशिवाय कुंटणखान्यातनू सोडणार नाही’, अशी धमकी देऊन तिला वेश्याव्यवसायास प्रवृत्त करण्यात आले. तरुणीचा छळ करण्यात आला. छळ असहय झाल्याने तिने तिच्या मित्राला या घटनेची माहिती दिली. पोलिसांच्या मदतीने तिची सुटका करण्यात आली. तेव्हा तरुणी पोलीस हवालदार मनीषा पुकाळे यांच्या संपर्कात आली. अमली पदार्थ विक्रीत अहिल्यानगर पोलीस दलातील एका पोलीस हवालदारासह साथीदारांना नुकतीच अटक करण्यात आली. त्यानंतर महिला पोलीस हवालदाराने बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी तरुणीवर कारवाई न करता तिच्याकडून पैसे घेतल्याचा प्रकार उघडकीस आला.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें