घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

*महामार्गावरील खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त, अपघातांचा धोका वाढला

पिंपरी-चिंचवड शहरासह मोशी उपनगरातून जाणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गावरील मुख्य चौक ते टोलनाक्यादरम्यान असलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालक व पादचाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खड्ड्यांमध्ये वाहने आपटल्याने दुचाकीस्वार अपघातग्रस्त होत असून, अनेकांना पाठदुखी, मानेचे आजार व शारीरिक त्रास जाणवत आहेत.

या खड्ड्यांमुळे वाहनांचे सस्पेन्शन, टायर व इतर भागांचे नुकसान होत आहे. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने ते लक्षात येत नाहीत आणि अपघातांचा धोका अधिक वाढतो.

शहरातून जाणारा हा मुख्य महामार्ग खड्ड्यांनी भरल्याने मोशी शहराच्या प्रतिमेला गालबोट लागले आहे. वाहतूक कोंडी, अपघात आदींमुळे आमच्यासारख्या नोकरीनिमित्ताने दैनंदिन प्रवास करताना अडचणीचे झाले आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें