घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

*पुण्यात घरफोडींचा सुळसुळाट

शहरात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. कोंढवा, मुंढवा, आंबेगाव भागात चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून 51 लाख रुपयांचा ऐवज लांबविला. कात्रज-कोंढवा रस्त्यावरील गोकुळनगर भागात भरदिवसा सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी साडेचार लाख रुपयांची रोकड, सोन्याचे दागिने असा 24 लाख 48 हजार रुपयांचा ऐवज लांबविला.

याबाबत एकाने येवलेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार गोकुळनगर भागातील एका सोसायटीत राहायला आहेत. चोरट्यांनी 2 फेबुवारी रोजी भरदिवसा सदनिकेचे कुलूप तोडून कपाटातील रोकड, दागिने असा ऐवज लांबविला. सहायक पोलीस निरीक्षक राकेश जाधव तपास करत आहेत.

मुंढव्यातील श्री गजानन महाराज सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील दोन लाख 15 हजारांची रोकड, दागिने असा 22 लाख 11 हजार रुपयांचा ऐवज लांबविला. याबाबत एकाने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. 5 फेबुवारी रोजी ही घटना घडली. पोलीस उपनिरीक्षक युवराज पोमण तपास करत आहेत.

घरात शिरून 87 हजार रुपयांचा ऐवज लंपासकोंढव्यातील काकडे वस्ती भागात भरदिवसा सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील 50 हजारांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा 87 हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना शनिवारी (7 फेबुवारी) घडली. याबाबत एका महिलेने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें