श्री संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त आठवडाभरापासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व श्री संत गजानन महाराज प्रकट दिन साजरा करण्यात आला.
काल्याच्या कीर्तनात उत्तम महाराज बडे यांनी मातृ शक्तीच्या महत्त्वावर विचार मांडले. मातेच्या परमार्थाची तुलना जगात कुठेही सापडणार नाही, असे सांगत त्यांनी संत शिरोमणी तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर यांच्या अभंगांचे दाखले देत स्त्री-शक्तीचे कुटुंब व समाज घडविण्यातील योगदान सांगितले. भक्तिमय वातावरणात अभंग, प्रवचन आणि हरिनामाचा गजर झाला. कार्यक्रमाच्या शेवटी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. श्री संत गजानन महाराज सर्व विश्वस्त व सेवेकरी सर्व सेवा न्यास यांच्यावतीने सप्ताहाचे आयोजन व व्यवस्था करण्यात आली होती.












