घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

*येरवडा पोलीस ठाण्याच्या कोठडीतून बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी पसार, तीन तासात अटकेत

येरवडा पोलीस ठाण्याच्या आवारातील कोठडीतून (लाॅकअप) पसार झालेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. लाॅकअपमधील स्वच्छतागृहातील काचा उचकटून आरोपी पसार झाला. पोलिसांनी तातडीने तपास करुन पसार आरोपीला येरवड्यातून अटक केली.

शैलेश राजू माेहिते (वय १९, रा. कामराजनगर, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरड यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोहिते याला अल्पवयीन युवतीवर बलात्कार, तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून प्रतिबंधक कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करुन त्याला ५ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती.

न्यायालयाने त्याला कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. रविवारी (८ फेब्रुवारी) सायंकाळी साडेसातच्या सुमारास मोहितेने काेठडीत अंथरण्यासाठी चादर हवी आहे, असा बहाणा केला. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांचे लक्ष चुकवून तो स्वच्छतागृहात केला. स्वच्छतागृहातील खिडकीच्या काचा सरकवून उतरला आणि पसार झाला.

काही वेळानंतर मोहिते पसार झाल्यााचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने मोहिते याला येरवडा परिसरातून रात्री दहाच्या सुमारास अटक केली. पोलीस उपनिरीक्षक महेश फटांगरे तपास करत आहेत.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें