घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

*पुण्यात 22 कोटींचा मोठा सायबर फ्रॉड!

पुणे सायबर पोलिसांनी मोठ्या ऑनलाइन गुंतवणूक फसवणूक प्रकरणात चार जणांना अटक केली आहे.या प्रकरणात हडपसर परिसरातील 85 वर्षांच्या निवृत्त व्यावसायिकाची सुमारे 22.03 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे.

या फसवणुकीत बनावट शेअर ट्रेडिंग वेबसाइट आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकाला आमिष दाखवण्यात आले होते. Cyber Crimeअटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील मुनिलकुमार सुरेंद्र सिंग वय 51, छत्रपती संभाजीनगर येथील आकाश चंद्रशेखर मराठे वय 27, लाला केशव उमप वय 26 आणि परमेश्वर दिलीप दाभाडे वय 23 यांचा समावेश आहे.

सर्व आरोपींना सोमवारी पुणे न्यायालयात हजर करण्यात आले असता गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.सायबर पोलिसांच्या तपासानुसार, आरोपींनी बनावट ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास कमी वेळात मोठा नफा मिळेल असे भासवले. सुरुवातीला थोड्या रकमेवर परतावा दाखवून पीडिताचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर हळूहळू मोठ्या रकमेची गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करून त्यांची फसवणूक करण्यात आली.

पोलिस उपायुक्त विवेक मासाळ यांनी सांगितले की, फसवणुकीची रक्कम अनेक बँक खात्यांमधून फिरवण्यात आली होती, त्यामुळे तिचा माग काढणे कठीण झाले. मात्र, तांत्रिक तपास आणि बँक व्यवहारांच्या विश्लेषणानंतर आरोपींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले.तपासात असेही समोर आले आहे की, अटक करण्यात आलेले आरोपी मुख्य सूत्रधार नसून ते पैशांची देवाणघेवाण करणाऱ्या नेटवर्कचा भाग होते.

कमिशनच्या बदल्यात त्यांनी आपल्या बँक खात्यांचा वापर करून दिला होता. या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.सायबर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, ऑनलाइन गुंतवणूक करताना खात्रीशीर माहिती घ्यावी आणि अनोळखी वेबसाइट किंवा अॅपवर पैसे गुंतवू नयेत.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें