घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

*मिळकत करात पाच टक्के वाढ?

महापालिकेच्या स्थायी समितीच्या गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत मिळकत करामध्ये सरसकट पाच टक्के वाढीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. हा प्रस्ताव येत्या बुधवारी (१८ फेब्रुवारी) होणाऱ्या मुख्य सभेत मंजुरीसाठी येणार असून, महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळालेला भाजप करवाढीचा प्रस्ताव मान्य करणार की तो फेटाळून नागरिकांना दिलासा देणार, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

या दिवशी निर्णय झाला नाही, तर पुणेकरांवर ५ टक्के करवाढ आपोआप लागू होण्याची शक्यता आहे.मिळकत कर विभागाने सुरुवातीला २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी थेट १० टक्के करवाढीचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला होता. मात्र, राजकीय पक्ष, नागरी संघटना आणि सर्वसामान्य नागरिकांकडून तीव्र विरोध करण्यात आला. त्यामुळे हा प्रस्ताव पुढे ढकलण्याच्या हालचाली सुरू झाल्या. मात्र, प्रशासनाला करवाढ लागू करायची असल्यास २० फेब्रुवारीपूर्वी मुख्य सभेची मान्यता घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे दहा टक्क्यांच्या करवाढीचा प्रस्ताव मागे घेऊन पाच टक्के करवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याची चर्चा महापालिकेच्या वर्तुळात आहे.

गेल्या तीन वर्षांत प्रशासकीय राजवटीत प्रत्येक वर्षी करवाढीचा प्रस्ताव मांडला गेला होता. मात्र, मुख्य सभा अस्तित्वात नाही, करवाढ हा धोरणात्मक निर्णय आहे, असे कारण देऊन तत्कालीन आयुक्तांनी ही दरवाढ फेटाळली होती. करवाढीच्या या प्रस्तावावर येत्या बुधवारी मुख्य सभेत निर्णय होण्याची शक्यता आहे. नऊ फेब्रुवारी रोजी महापौर निवडीसाठी बोलावलेली मुख्य सभा निवडीनंतर तहकूब करण्यात आली होती. हीच सभा आता बुधवारी पुन्हा होणार असून, त्यात करवाढीवर अंतिम निर्णय घ्यावा लागणार आहे. या दिवशी निर्णय झाला नाही, तर पुणेकरांवर ५ टक्के करवाढ आपोआप लागू होण्याची शक्यता आहे.

मिळकतकर विभागाने दहा टक्के करवाढीचा प्रस्ताव दिला होता. स्थायी समितीत त्यावर चर्चा होऊन ५ टक्के करवाढीस मंजुरी देण्यात आली आहे. हा प्रस्ताव येत्या बुधवारी होणाऱ्या मुख्य सभेत मान्यतेसाठी मांडण्यात येणार आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें