घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

वाढदिवस साजरा न करण्याचा खा. नितीन पाटील यांचा निर्णय


वाई, दि. 12(प्रतिनिधी प्रशांत थोरवे)

राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष कै. अजितदादा पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर राज्यसभा खासदार नितीनकाका पाटील यांनी यंदा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
खा. नितीनकाका पाटील यांचा आज गुरुवार, दि. १२ फेब्रुवारी रोजी वाढदिवस आहे. मात्र, सध्याच्या शोकमय वातावरणाचा विचार करून कोणताही उत्सव न साजरा करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.


या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, समर्थक व कार्यकर्त्यांनी वाढदिवसानिमित्त फ्लेक्स बोर्ड, जाहिराती लावू नयेत तसेच कोणतेही जाहीर कार्यक्रम आयोजित करू नयेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.


तसेच वाढदिवसानिमित्त कोणताही सत्कार, शुभेच्छा स्वीकृती कार्यक्रम होणार नसून त्या दिवशी ते कोणाचेही सत्कार अथवा शुभेच्छा स्वीकारणार नाहीत आणि त्यासाठी उपलब्ध राहणार नसल्याची नोंद घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
कै. अजितदादा पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदर व्यक्त करत आणि शोकभावनेतून हा निर्णय घेतल्याचे खा. नितीनकाका पाटील यांनी सांगितले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें