घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

*पुण्यात आरटीओच्या बनावट चलनाद्वारे व्यावसायिकाची सायबर फसवणूक

वाहतूक नियमभंग केल्याबाबत प्रादेशिक परिवहन विभागाचे (आरटीओ) बनावट चलन पाठवून सायबर चोरट्यांनी एका व्यावसायिकाची दोन लाख ९५ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.या प्रकरणी मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व्यावसायिक (वय ४७) मार्केट यार्ड परिसरातील वर्धमानपुरा सोसायटीत राहतात. सायबर चोरट्यांनी त्यांना वाहतूक नियमभंगाचे कथित चलन एपीके फाईलच्या माध्यमातून पाठविले. संबंधित चलनावर आरटीओचा उल्लेख असल्याने त्यांनी ती फाइल उघडली. फाइल उघडल्यानंतर त्यात वाहनाची माहिती आणि दंडाची रक्कम दिली होती. सुरुवातीला चोरट्यांनी त्यांना दहा रुपये भरून पुढील दंडाची रक्कम जमा करण्यास सांगितले.

त्यानंतर विविध कारणे देत बँक खात्याची गोपनीय माहिती घेतली. त्या माहितीच्या आधारे चोरट्यांनी व्यावसायिकाच्या बँक खात्यातून दोन लाख ९५ हजार रुपये काढून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यावसायिकाने मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, वाहतूक नियमभंगाचे बनावट चलन, थकीत वीज देयक किंवा एमएनजीएल गॅस बिलाच्या नावाखाली एपीके फाइल अथवा लिंक पाठवून फसवणूक करण्याचे प्रकार अलीकडे वाढले आहेत. नागरिकांनी अनोळखी मोबाईल क्रमांकावरून आलेल्या फाइल किंवा लिंक उघडू नयेत. तसेच, कोणतीही गोपनीय बँक माहिती शेअर करू नये, असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें