वाई प्रतिनिधी : प्रशांत थोरवे
वाई : ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पसरणी (ता. वाई) येथील विद्यार्थी रोशन ज्ञानदेव वाशिवले याने श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती संचलित विज्ञान महाविद्यालय काँग्रेस नगर नागपूर येथील सन २०२५-२६ मधील ५३ व्या राज्य बालवैज्ञानिक प्रदर्शनात माध्यमिक व उच्च माध्यमिक गट (९ वी ते १२ वी सर्वसाधारण) विभागात राज्यस्तरावर *तृतीय क्रमांक* पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांतून निवड झालेल्या १११ उत्कृष्ट उपकरणांमधून रोशनच्या “Smart Multipurpose Stick for Elderly People” या उपकरणाने विशेष स्थान मिळवत राज्यस्तरीय तृतीय क्रमांक पटकावला. वृद्धांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारे हे उपकरण असल्याने परीक्षकांनी त्याचे विशेष कौतुक केले. शालेय शिक्षण राज्यमंत्री मा.ना.डॉ.पंकजी भोयर साहेब, मा. डॉ. राजकुमार अवसरे साहेब संचालक राज्य विज्ञान शिक्षण संस्था रवी नगर नागपूर, प्राचार्य हर्षलता बुराडे, उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या यशाबद्दल मा. नामदार मकरंद आबा पाटील (मदत व पुनर्वसन मंत्री महाराष्ट्र राज्य) तसेच सातारा जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी मा. धनंजय चोपडे साहेब, उपशिक्षणाधिकारी मा. तेजस गंबरे साहेब, मा. गिरी साहेब, गटशिक्षणाधिकारी मा. हर्षवर्धन मोरे साहेब, विस्तार अधिकारी वाळेकर साहेब, सातारा जिल्हा समन्वयक श्री अंबादास भंडारे सर, लक्ष्मण उबाळे सर, श्री नितीन देसाई सर,अपराध सर तसेच वाई तालुक्यातील विज्ञान शिक्षकांनी रोशनचे विशेष अभिनंदन करून कौतुक केले. या यशामागे मार्गदर्शक शिक्षिका सौ. लीना जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच मार्गदर्शक पालक श्री. ज्ञानदेव वाशिवले सर व प्रा.सौ. सरस्वती वाशिवले यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
ज्ञानदीप स्कूलच्या प्राचार्या सौ. शुभांगी पवार तसेच विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, सचिव व पदाधिकारी यांनी रोशनचे अभिनंदन करून राष्ट्रीय स्तरावरील निवडीबद्दल विशेष कौतुक व्यक्त केले. विशेष म्हणजे, रोशनची बहिण कु. सज्ञा वाशिवले हिनेही दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय INSPIRE Award प्रदर्शनामध्ये राष्ट्रीय विजेती ठरून वाई तालुका,सातारा जिल्हा व महाराष्ट्र राज्याचे नाव उज्ज्वल केले असून तिला जपान येथे अभ्यास दौऱ्याची संधी मिळाली होती. तिने वाशिवली गावाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत नेले ही मोठी भूषणावाह बाबा आहे. वाशिवले कुटुंबातील या दोन्ही विद्यार्थ्यांनी ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, वाई या विद्यालयाचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे. सध्या त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.











