वाई प्रतिनिधी प्रशांत थोरवे
तालुक्यातील आसरे येथील रोहिडेश्वर शिक्षण संस्थेच्या कमंडलू पंचक्रोशी माध्यमिक विद्यालयात मंगळवार, दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २ वाजता डेट वायलर फार्मा पॅकेजिंग इंडिया लि. (केसुर्डी, ता. खंडाळा) व प्लॅनेट वॉटर फाउंडेशन, पुणे यांच्या सहकार्याने अद्ययावत ॲक्वा पुरिफायर वॉटर फिल्टरचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या अत्याधुनिक जलशुद्धीकरण प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. चैतन्य कुसुरकर (प्रकल्प व्यवस्थापक, प्लॅनेट वॉटर फाउंडेशन, पुणे) उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य मा. श्री. नंदकुमार कोकरे सर (क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक व ज्युनिअर कॉलेज, नायगाव, ता. खंडाळा) विराजमान होते.

यावेळी उद्योजक श्री. संतोष शेठ अंबवले (वाई), समाजसेवक श्री. आत्माराम सर्जेराव सणस (मुंबई), श्री. संजय जेधे देशमुख (अध्यक्ष, सर्वोदय ट्रस्ट, वाई), शाळेच्या माजी शिक्षिका सौ. शेख मॅडम, डॉ. श्री. रमेश तायडे, रोहिडेश्वर शिक्षण संस्थेचे संचालक श्री. बाबूराव चोरट (भाऊ), श्री. दिनकर दादा सणस, श्री. नारायण दादा सणस (माजी तंटामुक्ती अध्यक्ष, आसरे), श्री. शिवाजीराव धनावडे (माजी सरपंच, दहयाट), श्री. विशाल सणस (सामाजिक कार्यकर्ते), श्री. अंकुश चोरट यांच्यासह ग्रामस्थ, माजी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. प्रकाश जाधव यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन श्री. समीर सय्यद सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. संतोष डगळे यांनी मानले.
या जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या उभारणीत प्राचार्य मा. श्री. नंदकुमार कोकरे सर यांचा अत्यंत मोलाचा वाटा असून सुमारे तेरा लाख रुपये किमतीच्या या अद्ययावत पुरिफायरसाठी आवश्यक सहकार्य मिळवून देण्यासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच श्री. किरण सकटे, श्री. प्रकाश गावित, सौ. राठोड मॅडम, सौ. करवले मॅडम व कु. ऐश्वर्या मॅडम यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष मेहनत घेतली. हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला











