घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

*इन्स्टाग्रामवर ओळख; प्रेमाच्या जाळ्यात ओढून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

राजगुरुनगर – प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना खेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. संशयितास पोलिसांनी अटक केली असून, वैभव मुसळे (रा. कडूस, ता. खेड), असे त्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन पीडितेची आणि मुसळेची ओळख झाल्यावर त्याने तिला इन्स्टाग्रामवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. ती स्वीकारल्यावर इन्स्टाग्रामवर संपर्कात राहून प्रेमाच्या जाळ्यात ओढले‌.

त्यानंतर गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात एकदिवशी तिला एकमेकांबरोबर राहण्याबाबत चर्चा करायची सांगून बळजबरीने पेठजवळील लॉजवर नेले आणि बलात्कार केला. त्यानंतर त्याने सप्टेंबर महिन्यात पीडितेला एकदिवशी बोलावून घेतले. तो मागचा प्रकार कोणास सांगेल, या भीतीने ती त्याच्याकडे गेल्यावर तिला पुन्हा लॉजवर नेले आणि बलात्कार केला. तरी मुलीने घरी काही सांगितले नाही.

मात्र त्यानंतरही मुलगा पीडितेस इन्स्टाग्रामवर आणि फोन करून त्रास देत होता. म्हणून पीडितेने कुटुंबीयांच्या कानावर ही गोष्ट घातली आणि खेड पोलिसांत तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुसळे याच्यावर बलात्काराचा आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आणि अटक केली.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें