घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

*पहलगाम हल्ल्यातील मृत संतोष जगदाळे यांच्या कन्येची व्यथा

‘गेल्या काही दिवसांपासून आम्ही आर्थिक अडचणींचा सामना करीत आहोत. राज्य शासनाने नोकरीचे आश्वासन दिले होते. मात्र, नोकरीच्या प्रस्तावाला मंत्रालयातून अद्यापही मंजुरी नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भेटण्याचाही प्रयत्न केला.

मात्र, भेट होऊ शकली नाही,’ अशी व्यथा पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले संतोष जगदाळे यांची कन्या आसावरी यांनी बोलताना मांडली.

‘पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळे यांच्या कुटुंबाला न्याय द्यावा, जगदाळे यांची कन्या आसावरी यांना शासकीय नोकरीत रुजू करून घ्यावे,’ अशी मागणी राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली. त्या पार्श्वभूमीवर आसावरी यांच्याशी संवाद साधला असता, त्या म्हणाल्या, ‘महापालिकेत नोकरी देण्यासंदर्भातील प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून गेल्या वर्षी जुलै महिन्यात मंत्रालयात पाठविण्यात आला. मंत्रालयातून अद्यापही या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलेली नाही. या संदर्भात मंत्रालयाच्या स्तरावरही पाठपुरावा करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र, भेट होऊ शकली नाही.

‘या संदर्भात पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क साधूनही सरकारी पातळीवरून कोणताही संपर्क करण्यात आलेला नसल्याचे त्यांनी सांगितले.आसावरी यांनी भारती विद्यापीठ येथून मानव संसाधन व्यवस्थापनात (एचआर) एमबीए; तसेच एच. व्ही. देसाई महाविद्यालयातून संगणकशास्त्र विषयात बी.एस्सी. पदवी घेतली आहे. खासगी क्षेत्रातील अनुभवही त्यांच्याकडे आहे. त्यांना सामान्य प्रशासन विभागातील वर्ग-२ प्रशासकीय अधिकारी पद देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

पहलगाम येथे गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर जगदाळे यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. या प्रकारानंतर संतोष जगदाळे यांची कन्या आसावरी यांना सरकारी नोकरीत घेतले जाईल, अशी घोषणा करण्यात आली. मात्र, त्याची पूर्तता अद्यापही झालेली नाही.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें