घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

*दौंडमध्ये इंडियन ऑईल गॅस टेम्पोची दुचाकीला पाठीमागून धडक

सेवा रस्त्यावरून निघालेल्या दुचाकीला इंडियन ऑईल गॅसच्या टेम्पोने पाठीमागून दिलेल्या धडकेत दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

पांढरेवाडी, मुकादमवाडी (ता. दौंड गावचे हद्दीतील इटरनेस प्रा. लि. कंपनीचे पाठीमागील सेवा रस्त्यावर शनिवारी (ता. 14) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

भरत संतोष जाधव (रा. मळद ता. दौड जि. पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. तर स्वप्नील दत्तात्रय सुतार (वय-21, व्यवसाय शेती, रा. मळद, ता. दौंड) असे जखमी दुचाकी चालकाचे नाव आहे. स्वप्नील सुतार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार इंडियन ऑईल गॅसच्या टेम्पो चालक चंद्रकांत आसराजी शेंबडे (रा. धाखंटा ता. गेवराई जि. बीड) याच्यावर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता. 14) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पांढरेवाडी गावचे हददीत इटरनेस प्रा. लि. कंपनीचे पाठीमागे सर्विस रोडवर स्वप्नील सुतार व भरत जाधव हे दोघेजण कुंजीरवाडी येथून चहा पत्ती घेवुन मळदकडे दुचाकी मोटार सायकलवरून निघाले होते.

यावेळी पाठीमागुन आयरश कंपनीचा इंडियण ऑईल गॅसचा टेम्पो नं MH/10/EJ/9111 हि वरील चालक चंद्रकांत शेंबडे याने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगात चालवून वाहतुकीच्या नियमनाकडे दुर्लक्ष करून मोटर सायकलला पाठीमागुन जोरात धडक दिली.

या अपघातात भरत जाधव याचे डोकीस, पोटावर, हाता-पायाला गंभीर व किरकोळ दुखापतीस होवुन मयत झाला. तर स्वप्नील सुतार यांना किरकोळ गंभीर व किरकोळ दुखापत झाली. तसेच मोटर सायकलचे नुकसानीस कारणीभुत झाला आहे.

दरम्यान, याप्रकरणी आरोपी वाहन चालक चंद्रकांत शेंबडे याच्यावर दौंड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 106(1), 281, 125(a), 125(b), 324(4) तसेच मोटर वाहन अधिनियम 1988 कलम 184, 134, 177 नुसार कारवाई करण्यात आली आहे. तपास पोलीस हवालदार पठाण करीत आहेत.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें