घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

*रईसजाद्याच्या ‘रील’चा नाद साहिलच्या जीवावर बेतला

माझ्या मुलाला 23 वर्ष एकटीने लहानाचे मोठे केले. तो माझा एकुलता एक आधार होता. पण काही सेकंदांची रील बनवण्यासाठी घरून निघालेल्या एका रईसजाद्याने माझ्या मुलाचा जीव घेतला. आज तो आरोपी जामिनावर बाहेर फिरतोय आणि मी मात्र माझ्या पोटच्या गोळ्यासाठी न्यायाची भीक मागतेय.

हा आक्रोश आहे एका सिंगल मदरचे. दिल्लीत 3 फेब्रुवारी रोजी झालेल्या भीषण अपघातामध्ये तिचा एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

दिल्लीतील द्वारका भागामध्ये 3 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी बाराच्या सुमरास लाल बहादूर शास्त्री कॉलेज जवळ भीषण अपघात झाला. एका सुसाट स्कॉर्पिओने दुचाकी आणि टॅक्सीला उडवले. या अपघातामध्ये दुचाकीस्वार साहिल धनेश्रा (वय – 23) याचा जागीच मृत्यू झाला. तर टॅक्सी चालक अजित सिंह गंभीर जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला.

पोलीस तपासामध्ये अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. स्कॉर्पिओ चालवणारा मुलगा केवळ 17 वर्षांचा अल्पवयीन होता. त्याच्याकडे ना ड्रायव्हिंग लायसन्स होते, ना गाडी चालवण्याचं पुरेसे ज्ञान. केवळ सोशल मीडियावर स्टंटबाजीचे व्हिडिओ आणि ‘फन रील’ अपलोड करण्याच्या नादात तो ही महागडी गाडी रस्त्यावर सुसाट धावत होता. त्याचा रील बनवण्याचा छंद साहिलच्या मृत्यूचे कारण ठरला.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें