घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

*साखरझोपेत असतानाच अनर्थ घडला, स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना

ठाण्यामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरात एका इमारतीचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु असून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच बचाव पथकाने धाव घेत संपूर्ण इमारत रिकामी केली आहे.

इमारतीचा स्लॅब कोसळला, 3 जण जखमी

याबाबत सविस्तर माहिती अशी की, ठाण्यामधील शांतीनगर वागळे इस्टेट परिसरातील नूतन नीलम अपार्टमेंटच्या पाच मजली इमारतीमध्ये स्लॅब कोसळल्याची दुर्घटना घडली. इमारतीचा 501 रूम नंबरचा स्लॅब 402 रूम नंबरच्या फ्लॅटमध्ये कोसळला. या घटनेत तीन जण जखमी झाले आहेत. गजेंद्रप्रसाद प्रिन्स यादव आणि प्रदीप यादव अशी जखमींची नावे आहेत.

सदर व्यक्तींना उपचारासाठी गंगुबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी प्रदीप यादव यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचाराकरता फोर्टिस हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. इमारतीमध्ये एकूण 26 रूम असून त्यामध्ये एकूण अंदाजे 90 ते 95 व्यक्ती राहतात. घटनेच्या वेळी तिन्ही कामगार साखर झोपेत होते. पहाटेच्या वेळी घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली.

इमारत तात्काळ रिकामी

दुर्घटनेची माहिती मिळताच महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तसेच बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. सदरची इमारत c2b या प्रवर्गामध्ये येत असल्याने इमारत धोकादायक स्थितीत असल्या कारणाने सुरक्षेच्या कारणास्तव सदर इमारत पूर्ण रिकामी करण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन कर्मचाऱ्यांनी इमारतीला पूर्णपणे सीलबंद करण्यात आले आहे व पुढील कारवाई ठामपा बांधकाम विभाग यांच्याकडून करण्यात येणार आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें