घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

*खराडीतील ‘त्या’ 12 लाखांच्या ड्रग्जने उलगडलं 4 कोटींचं घबाड

पुणे पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी मोहिमेत मोठे यश मिळवत राजस्थानमधील जोधपूर येथे छापेमारी करून सुमारे 4 कोटी रुपये किमतीचे एमडी (मेफेड्रोन) हे अंमली पदार्थ जप्त केले आहे. या प्रकरणात सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

आंतरराज्यीय पातळीवर कार्यरत असलेल्या या अंमली पदार्थ तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्याने गुन्हेगारी विश्वात खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपूर्वी पुण्यातील खराडी परिसरात पोलिसांनी सापळा रचून 12 लाख रुपये किमतीचे 27 ग्रॅम एमडी हे अमली पदार्थ जप्त केले होते. या कारवाईदरम्यान काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर या प्रकरणाचे धागेदोरे थेट राजस्थानमधील जोधपूरपर्यंत पोहोचत असल्याचे उघड झाले. त्यानुसार पुणे पोलिसांनी विशेष पथक तयार करून जोधपूर येथे छापेमारी केली.

रॅकेटचा मुख्य सूत्रधार रामकरण जाट याला अटक

या कारवाईत या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार रामकरण जाट याला अटक करण्यात आली. रामकरण जाट हा मोठ्या प्रमाणावर एमडी तयार करून विविध राज्यांमध्ये त्याचा पुरवठा करत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. त्याच्याकडून आणि त्याच्या सहकाऱ्यांकडून एकूण 1 किलो 960 ग्रॅम एमडी अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून, याची अंदाजे बाजार किंमत सुमारे 4 कोटी रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पुण्यातही विविध ठिकाणी एकाच वेळी छापेमारी

दरम्यान, पुण्यातही विविध ठिकाणी एकाच वेळी छापेमारी करत या रॅकेटशी संबंधित अन्य पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून अंमली पदार्थ विक्रीसाठी वापरण्यात येणारी वाहने, मोबाईल फोन, डिजिटल उपकरणे आणि काही महत्त्वाची कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. या सर्व पुराव्यांच्या आधारे पोलिसांकडून पुढील तपास वेगाने सुरू आहे.

अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला मोठे बळ

हे अंमली पदार्थ किती जणांना विकले गेले, त्यांची वितरण साखळी किती मोठी आहे, तसेच यामागे आणखी कोणते मोठे मास्टरमाइंड आहेत का, याचा सखोल तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. आंतरराज्यीय पातळीवर पसरलेल्या या रॅकेटचा संपूर्ण छडा लावण्यासाठी विविध राज्यांच्या पोलिसांशी समन्वय साधण्यात येत आहे. या यशस्वी कारवाईमुळे पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला मोठे बळ मिळाले असून, शहरात अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळ्यांना कडक संदेश मिळाल्याचे बोलले जात आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें