घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

*तडीपार आरोपी दत्ता होळकर जेरबंद;

फुरसुंगी पोलिसांनी तडीपार आदेशाचा भंग करणाऱ्या आरोपीला शिताफीने अटक करत कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. दत्ता रामभाऊ होळकर (रा. होळकरवाडी, ता. हवेली, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५, पुणे शहर यांनी आदेश क्र. ८०/२०२४, दिनांक १६/११/२०२४ अन्वये महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ (१) (अ) (ब) प्रमाणे दत्ता होळकर यास पुणे शहर, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय परिक्षेत्र तसेच पुणे जिल्हा कार्यक्षेत्राच्या हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार केले होते.

आरोपीविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून तो धोकादायक प्रवृत्तीचा असल्याचे नमूद करण्यात आले आहे.दि. १७/०२/२०२६ रोजी फुरसुंगी पोलीस स्टेशनचे तपास पथक वरिष्ठांच्या आदेशानुसार पाहिजे आरोपी, तडीपार आरोपी शोध मोहीम, अवैध धंद्यांवर कारवाई तसेच गुन्हे प्रतिबंधासाठी पेट्रोलिंग करत होते.

यावेळी पोलीस अंमलदार अभिजित टिळेकर यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, तडीपार आरोपी दत्ता होळकर हा महादेव मंदिरासमोर, होळकरवाडी येथे आला आहे.मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे सापळा रचण्यात आला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पळून जाण्याच्या तयारीत होता; मात्र पोलिसांनी शिताफीने पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान संबंधित ठिकाणी येण्यासाठी कोणतीही अधिकृत परवानगी नसल्याचे स्पष्ट झाले.

तडीपार आदेशाचा भंग करून होळकरवाडी येथे आढळून आल्यामुळे आरोपीविरुद्ध Fursungi Police Station येथे गु.र. नं. ५८/२०२६, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई मा. डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उपआयुक्त, परि.-६, पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा. अनुराधा उदमले (सहा. पोलीस आयुक्त, लोणीकाळभोर विभाग), श्री. अमोल मोरे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, फुरसुंगी पोलीस स्टेशन) यांच्या सूचनेनुसार पार पडली.

या पथकात पोलीस हवालदार नितीन गायकवाड, सागर वणवे, हरिदास कदम, श्रीनाथ जाधव तसेच पोलीस अंमलदार हेमंत कामथे व अभिजित टिळेकर यांनी सहभाग घेत प्रशंसनीय कामगिरी बजावली.सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार हरिदास कदम हे करत आहेत.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें