घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या पदाधिकाऱ्यांची एकाच दिवशी निवड

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर आता सर्वांनाच अध्यक्ष आणि पदाधिकारी निवडीची ओढ लागली आहे. निवडणुकीनंतर ११ फेब्रुवारीला नवनिर्वाचित सदस्यांची अधिसूचना काढण्यात आली.

मात्र त्यानंतर अद्याप पदाधिकारी निवडीची प्रक्रिया अथवा त्यासाठी सर्वसाधारण सभा आणि निवडणुकीची तारीख प्रशासनाकडून घोषित करण्यात आलेली नाही.त्यामुळे अध्यक्ष आणि पदाधिकारी कधी नेमण्यात येणार? असा सवाल विचारण्यात येत आहे. प्रशासनाकडून संपूर्ण राज्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती एकाच दिवशी करण्याबाबतचा विचार सुरू असल्याचा समोर येतअसून त्या दृष्टिकोनातून प्लॅनिंग देखील सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायतसमिती निवडणुकांचा निकाल ९ फेब्रुवारीला लागला. त्यानंतर अधिसूचना काढण्यात आली. कायद्यातील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी यांच्याकडून सभापती त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे पदाधिकारी निवडीची प्रक्रिया केली जाते. पहिली सभा बोलवण्याच्या अधिकारदेखील जिल्हाधिकाऱ्यांना आहेत.

प्राप्त तरतुदीनुसार जिल्हा परिषदेचा कालावधी संपल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी नवीन पदाधिकारी निवडीसाठी बैठक बोलली जाते. जर सदस्य मंडळाचा कालावधी संपुष्टात आला असेल, तर सहा महिन्याच्या आत निवडणूक घेऊन पदाधिकारी निवडावे लागतात; परंतु गेले तीन वर्ष आणि दहा महिने प्रशासकीय राजवट असल्याने या दोन्ही तरतुदी लागू होत नाहीत.

त्यामुळे स्वतंत्रपणे पदाधिकारी निवडणुकीचा कार्यक्रम आणि तारीख जिल्हाधिकाऱ्यांना काढावी लागेल. अगोदर पंचायतसमिती पदाधिकारी आणि त्यानंतर जिल्हा परिषद पदाधिकारी निवडी होतील. तो पर्यंत नवे पदाधिकारी प्रतिक्षेत आहेत. काही नवनिर्वाचित सदस्य आता कामांसाठी जिल्हा परिषदेत फेऱ्या मारू लागले आहेत.

राज्यात एकाच तारखेला निवड

राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायतसमित्या यांच्या निवडणुका झाल्या आहेत. त्यामुळे पदाधिकारी निवड करताना सर्वसाधारणपणे एकच तारीख राज्यात असावी यासाठीचा देखील विचार सुरू आहे, याबाबत ग्रामीण विकास विभाग निर्णय करेल; परंतु निवडणुकांचा निकाल होऊन जवळपास नऊ दिवसांचा कालावधी लोटल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना ही बाब दुर्लक्षित करता येत नाही.

त्यामुळे किमान पुणे विभागामध्ये पाच जिल्हा परिषदांच्या निवडणुका झाल्या आहेत. त्यांची तरी एकसारखी तारीख असावी असादेखील प्रयत्न विभागीय आयुक्त स्तरावर सुरू आहे. कारण वेगवेगळ्या तारखा दिल्यास प्रवर्गाचा कालावधी वेगळ्या तारखेला संपेल आणि निवडणुका ही भविष्यात वेगळ्या तारखांना घ्याव्या लागतील. पुणे जिल्ह्यात निवडणूक प्रशासनाकडून निवडणुकांच्या तारखेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आल्याचे समजते. त्यामध्ये फेब्रुवारीच्या अखेरीस किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडले जातील.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें