घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

बाणेरमध्ये महापालिकेकडून बेकायदा बांधकामांवर हातोडा

बाणेरमधील सर्व्हे क्रमांक ५१ व ५२ येथील बाणेर-सूस रस्त्यावरील बीडीपी झोनमधील, तसेच इमारतीचे फ्रंट व साइड मार्जिनमधील अनधिकृत हॉटेल, पत्रा शेड व पक्क्या स्वरूपाच्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेच्या बांधकाम विकास विभाग झोन ३ यांच्यामार्फत पोलिस कर्मचाऱ्यांच्या मदतीने कारवाई करण्यात आली.

या कारवाईमध्ये सुमारे २०,५०० चौरस फूट विनापरवाना अनधिकृत क्षेत्र हटविण्यात आले. परिसरातील अनधिकृत बांधकाम, तसेच अतिक्रमणांबाबत महापालिका प्रशासनाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

कारवाईत महापालिकेचे अधिक्षक अभियंता, बांधकाम विभाग झोन क्रमांक ३ चे कार्यकारी अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता, कनिष्ठ अभियंता व सहाय्यक पोलिस निरीक्षक यांच्या पथकाने व दोन जेसीबी, एक गॅस कटर, दहा अतिक्रमण कर्मचारी यांच्या मदतीने कारवाई पूर्ण करण्यात आली. कारवाईच्या वेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें