घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

व्हॉट्सअॅप स्टेटसवर महात्मा फुले दांपत्यांचा अवमान

व्हॉट्सअॅप स्टेटसवर समाजसुधारक महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी विंश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्त्या तसेच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या आदिती गणेश बाबर यांनी तक्रार दाखल केली आहे.

फिर्यादीनुसार, नाशिक जिल्ह्यातील बॉम्बे नाका परिसरातील महात्मा फुले दांपत्यांच्या स्मारकाजवळ एका युवकाने व्हिडिओ चित्रित करून त्यामध्ये महापुरुषांबाबत अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप आहे. संबंधित व्हिडिओ व्हॉट्सअॅप स्टेटसवर प्रसारित करण्यात आला होता.

आदिती बाबर या येरवडा येथील पोरवाल पार्क परिसरात कुटुंबासह वास्तव्यास असून सामाजिक कार्य करतात. कृष्णा चौधरी (वय अंदाजे २७, रा. मालेगाव, जि. नाशिक) याचा मोबाईल क्रमांक त्यांच्या फोनमध्ये सेव्ह असल्याने दोघांना एकमेकांचे व्हॉट्सअॅप स्टेटस दिसत होते. दि. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ८ वाजता त्यांनी संबंधित स्टेटस पाहिल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

सदर कृत्य हे महापुरुषांचा जाणीवपूर्वक अवमान करून त्यांची बदनामी करण्याच्या उद्देशाने करण्यात आल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. या घटनेप्रकरणी कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी पोलीसांकडे केली आहे.

“यापुढे कोणत्याही महामानवाचा अपमान करण्याचा प्रयत्न झाल्यास तो कदापिही सहन केला जाणार नाही,” असा इशाराही बाबर यांनी दिला. तक्रार नोंदविताना संध्या शिंदे व महेश पाटील हे उपस्थित होते. पुढील तपास विंश्रांतवाडी पोलीस करत आहेत.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें