घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

शिवजयंतीनिमित्त विद्यार्थ्यांचा सिंहगडावर प्रेरणादायी स्वच्छता आणि समाजसेवा उपक्रम

शिवजयंती निमित्त दरवर्षी मोठ्या संख्येने शिवभक्त व पर्यटक किल्ले सिंहगड येथे दर्शनासाठी व ऐतिहासिक स्थळाला भेट देण्यासाठी एकत्र येतात; मात्र वाढत्या गर्दीमुळे किल्ल्याच्या परिसरात प्लास्टिक, पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थांचे पॅकेट्स तसेच इतर कचरा मोठ्या प्रमाणात साचलेला दिसून येतो.

याच पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांना शब्दांपेक्षा कृतीतून अभिवादन करण्याच्या उद्देशाने शुक्रवार दिनांक २० फेब्रुवारी २०२६ रोजी, शिवजयंतीच्या दुसऱ्या दिवशी, सकाळी ०७:०० वाजता किल्ले सिंहगडावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

श्रीमती सुधाताई मांडके कॉलेज येथील विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने उत्सव साजरा करत सिंहगड किल्ला येथे स्वच्छता अभियान राबवले.या उपक्रमात एकूण २३ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत सामाजिक बांधिलकीची जाणीव दाखवून दिली. विद्यार्थ्यांनी किल्ल्यावरील प्लास्टिक व इतर कचरा गोळा करून परिसर स्वच्छ केला तसेच पर्यटकांनाही स्वच्छता राखण्याचे आवाहन केले.

“स्वच्छ किल्ला – सुरक्षित वारसा” असा संदेश देत विद्यार्थ्यांनी जनजागृती केली.या उपक्रमाचे समन्वयक एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा. विश्वेश लोहार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व स्वतः प्रत्यक्ष सहभाग घेत त्यांना प्रोत्साहित केले. त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने संपूर्ण परिसरात स्वच्छता मोहीम राबवली.

याचबरोबर विद्यार्थ्यांनी शूर मराठा सरदार तानाजी मालुसरे यांच्या समाधी परिसराची स्वच्छता करून त्यांना अभिवादन केले. या कृतीमुळे इतिहासाविषयी आदर व राष्ट्रीय अभिमान व्यक्त झाला.विद्यार्थ्यांनी घेतलेला हा उपक्रम पर्यावरण संरक्षण, सामाजिक जबाबदारी आणि ऐतिहासिक वारसा जपण्याचा प्रेरणादायी आदर्श ठरला असून नागरिकांनीही या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें