घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

कोंढव्यात किरकोळ वादातून १७ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला

कोंढवा परिसरात किरकोळ वादातून १७ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने वार करत मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, अन्य दोघांचा शोध सुरू आहे.

असिफ हिदायत शेख (वय २४, रा.कोंढवा) आणि आवेज इलियास शेख (वय २४, रा. मीठानगर, कोंढवा) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास कोंढव्यातील गल्ली क्रमांक दोनमध्ये फिर्यादी आणि त्याचा मित्र बसले होते.त्यावेळी आरोपींनी जुन्या वादातून हल्ला केला. आरोपींनी धारदार शस्त्राने तरुणाच्या हातावर व मांडीवर वार केले.

तसेच, त्याच्या मित्राला हॉकी स्टीकने मारहाण करून जखमी केले. या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें