घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

हिंजवडीत घरगुती वादातून पत्नीवर चाकू हल्ला; पती अटकेत

हिंजवडी परिसरात घरगुती वादातून पत्नीवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी महेंद्र सोपान कांबळे (वय ३५, व्यवसाय सिक्युरिटी गार्ड, रा. किरण येवडे यांची रूम, येवडेवस्ती, लक्ष्मी चौक, हिंजवडी, पुणे) यास पोलिसांनी अटक केली आहे.

हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०६/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९, ११४(२), ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २१ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास किरण येवडे यांच्या रूममध्ये ही घटना घडली.

फिर्यादी महिला व त्यांचा पती महेंद्र कांबळे यांचा मुलगा प्रतीक याच्याशी शैक्षणिक बाबींवरून जोरदार वाद सुरू होता. हा वाद सोडवण्यासाठी फिर्यादी मध्ये पडली असता आरोपी पतीला राग अनावर झाला.

रागाच्या भरात आरोपीने घरातील लाकडी टेबलावर ठेवलेला भाजी कापण्याचा चाकू हातात घेऊन “तुला आता जिवंत सोडणार नाही” अशी धमकी देत फिर्यादी महिलेच्या पोटात चाकूने भोसकून गंभीर जखमी केले. जखमी महिलेवर तातडीने उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आरोपीस अटक केली. पुढील तपास पोलीस नाईक मोरे करत आहेत.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें