आज विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे पार पडलेल्या लोकमत पुणे महामॅरेथॉन मध्ये असंख्य धावपटू आणि पुणेकरांनी भाग घेतला.नागरिकांच्या निरोगी आयुष्यासाठी लोकमत ने सुरू केलेल्या या महा मॅरेथॉन मध्ये आज स्पर्धकांचा उत्साह वाढविण्यासाठी आयोजकांच्या वतीने,स्पर्धेविषयी योग्य मार्गदर्शन, ढोल ताशा संगीत,हेल्दी खाद्यपदार्थ,ड्रिंक्स,फिजिओथेरपिस्ट,अश्या विविध प्रकारचे नियोजन केले होते.
असंख्य पुणेकर या महा मॅरेथॉन मध्ये धावत असताना आपल्या पुणे वृत्तपत्र विक्रेता संघ आणि पद्मावती विभागातील विक्रेत्यांनी या महा मॅरेथॉन मध्ये भाग घेऊन “धावाल तर तंदुरुस्त रहाल.!”हा संदेश पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाच्या वतीने देऊन स्पर्धकांना शुभेच्या दिल्या.
तसेच”ज्ञानाची शिदोरी वृत्तपत्र घरोघरी”वाचन संस्कृती टिकवा,मोबाईल टाळा *हा संदेश देणारे आपल्या संघटनेचे पोस्टर सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसले.
पुणे वृत्तपत्र विक्रेता संघ पद्मावती विभागातील राम जाधव,सोमनाथ शिर्के,राहुल गडाप्पे,सुधाकर गायकवाड यांनी या लोकमत पुणे महा मॅरेथॉनच्या विविध किलोमीटरच्या गटात भाग घेतला.आरोग्यासाठी हितकारक अश्या स्पर्धेच्या आयोजनासाठी लोकमत समूहाचे मनापासून आभार..!**पुणे वृत्तपत्र विक्रेता संघ* *पद्मावती विभाग*












