घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

पुण्यातील संशोधनाची मोठी झेप, ‘आयआयटीएम’ची नवी ‘प्रणाली’!

भारतीय अर्थव्यवस्थेचा आणि शेतीचा कणा असलेल्या मॉन्सूनचा आता केवळ एका हंगामापुरता नव्हे, तर चक्क पुढील दहा वर्षांचा (दशकभराचा) अचूक अंदाज वर्तविणे शक्य होणार आहे. पुण्यातील ‘भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थे’तर्फे (आयआयटीएम) ‘दशक हवामान अंदाज प्रणाली’ विकसित करण्यात आली.

या प्रणालीमुळे पावसाचे प्रमाण, तापमानातील बदल आणि जागतिक हवामान बदलांचा आपल्या मॉन्सूनवर होणारा परिणाम अधिक अचूकपणे समजायला मदत होणार आहे. या महत्त्वपूर्ण संशोधनाचा सविस्तर अहवाल ‘आयआयटीएम’तर्फे नुकताच प्रसिद्ध केला आहे.

भारतीय मॉन्सूनमध्ये दरवर्षी आणि दर दहा वर्षांनी होणारे मोठे बदल समजून घेणे, हे नेहमीच आव्हानात्मक असते. यावर मात करण्यासाठी ‘आयआयटीएम’ने ही नवी प्रणाली विकसित केली असून, हवामान संशोधनात ही एक मोठी आणि महत्त्वाची झेप मानली जात आहे. एक ते दहा वर्षांच्या कालावधीसाठी अधिक खात्रीशीर अंदाज वर्तवता यावा, यासाठी संस्थेच्या आधीच्या ‘पृथ्वी प्रणाली नमुन्यावर’ आधारित हे नवे तंत्रज्ञान विकसित केले आहे.

या नव्या प्रणालीत केवळ हवेचाच नाही, तर जमिनीखालच्या आणि वातावरणातील अनेक घटकांचा अत्यंत बारकाईने अभ्यास करण्यात आला आहे. यामध्ये जमिनीचा प्रकार, माती, वनस्पती, जमिनीच्या आतले तापमान आणि भूप्रदेशाची रचना यांचा समावेश आहे. याशिवाय हवेतील सूक्ष्म कण, प्रदूषण वाढवणारे वायू (हरितगृह वायू), ओझोन आणि सूर्याच्या उष्णतेचा प्रभाव या सगळ्याचाही विचार केला गेला आहे. या मुळे पाऊस, तापमान आणि हवेतील आर्द्रता यांचे अधिक अचूक अंदाज मिळणे सोपे झाले आहे. ही प्रणाली अतिशय प्रगत असली, तरी यात अजून काही सुधारणांना वाव असल्याचे संशोधकांनी प्रांजळपणे सांगितले. विशेषतः समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमानातील बदल आणि हवेतील सूक्ष्म कण आणि ढग यांचा एकमेकांवर होणारा परिणाम, यावर अधिक अचूकता आणण्यासाठी भविष्यात काम केले जाणार आहे.

अचूकतेत मोठी वाढ

‘आयआयटीएम’च्या अहवालानुसार, या नव्या प्रणालीमुळे हवामानाच्या अंदाजातील त्रुटी खूप कमी झाल्या आहेत. भारतातील मुख्य मॉन्सून पट्ट्यात नक्की किती पाऊस पडेल, याचे अधिक वास्तवदर्शी चित्र यातून उभे राहते. मॉन्सूनच्या वाऱ्यांची दिशा, त्यांचा वेग, तापमानातील बदल याबरोबरच प्रशांत आणि अटलांटिक महासागरात होणाऱ्या हवामान बदलांचा (चक्रे) भारतीय मॉन्सूनवर काय परिणाम होईल, हेही या प्रणालीद्वारे अचूकपणे समजणार आहे.

कोणाला होणार फायदा?

आजवर मॉन्सूनचा अंदाज केवळ एका वर्षापुरता मर्यादित असायचा. मात्र, नव्या तंत्रज्ञानामुळे पुढील दहा वर्षांच्या हवामानाचा कल समजणार आहे. त्यामुळे देशाचे शेती नियोजन, धरणे आणि पाण्याचे व्यवस्थापन, तसेच दुष्काळ व आपत्ती व्यवस्थापनासाठी दीर्घकालीन धोरण ठरविणे प्रशासनाला अधिक सोपे होणार आहे.

या संशोधकांचे योगदान

हा संशोधन अहवाल पी. व्ही. राजेश, रोसिमिथा पांडा, सी. ज्ञानसीलन, राहुल पै, रश्मी काकटकर, दर्शना पाटेकर, जे. एस. दीपा, ए. जी. प्रजीश, अमित कुमार शर्मा, टी. एस. फौसिया, सुब्रता हलदर, अनिला सेबॅस्टियन, अनंत पारेख आणि सैकत प्रमाणिक या शास्त्रज्ञांच्या चमूने तयार केला आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें