खंडाळा प्रतिनिधी : संदेश चव्हाण
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अतिट आणि सौ. सुशीला ताई परांजपे विद्यालय अतिट येथे विद्यार्थ्यांचा कला गुणदर्शक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी नृत्य, गीत, वकृत्व आणि नाट्य सादरीकरणातून आपली कला सादर करत उपस्थितांची मनं जिंकली. याच निमित्ताने धर्मवीर संभाजी महाराज यांच्या बलिदान मासानिमित्त आज अतिट येथे अक्षय ब्लड बँक यांच्या मार्फत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान अतिट यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक बांधिलकी जपत अनेक शंभू भक्त आणि ग्रामस्थ मंडळ अतिट यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

या शिबिरासाठी अक्षय ब्लड बँकचे अक्षता नावडकर, अर्पिता नावडकर, श्रीकांत नावडकर, शिवानी पूजारी, प्रणाली मोरे, ऋतुजा साबळे आणि वैष्णवी शिर्के आदी कर्मचारी उपस्थित होते. प्रत्येक रक्तदात्यास ‘शककर्ते शिवराय’ आणि ‘छावा’ या कादंबऱ्या भेट स्वरूपात देण्यात आल्या.शिबिर यशस्वी पार पाडण्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान अतिटचे धारकरी प्रितम जाधव, प्रसाद जाधव, रोहित जाधव, उदय चव्हाण, प्राची चव्हाण आणि शुभम जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

शिबिराची सांगता झाल्यानंतर ब्लड बँकेच्या वतीने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान अतिट यांचे विशेष आभार मानण्यात आले. धर्मवीर संभाजी महाराजांच्या बलिदान मासानिमित्त आयोजित या रक्तदान शिबिराने सामाजिक एकतेचा आणि मानवतेचा संदेश दिला.











