घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

ताम्हिणी घाटात रानमेव्याची प्रवाशांना गोडी

ताम्हिणी घाट परिसरातील आदिवासी कातकरी समाजातील नागरिक सध्या आमगुळे या रानमेव्याची विक्री करीत आहेत. पर्यटक तसेच पुणे-कोलाड महामार्गावरून प्रवास करण्यांना रानमेव्याची गोडी लागली आहे.रानमेव्याच्या विक्रीमुळे आदिवासींच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. हरभऱ्याच्या घाटीसारखा आकार असलेली ही आमगुळे चवीला आंबट, तुरट आणि किंचित गोड लागतात.

ताम्हिणी, सारोळे आणि निवे परिसरातील पुणे-कोलाड महामार्गालगतच्या जंगलातून मोठ्या पानांच्या घडीत ही आमगुळे गोळा केली जातात.स्थानिक कातकरी बांधव रानात मेहनतीने जमा केलेल्या सुमारे २५ ते ३० आमगुळे केवळ २० रुपयांना विक्रीस ठेवत आहेत. हंगामी स्वरूपाचा हा रानमेवा ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये तसेच पर्यटकांकडून आवडीने घेतला जातो.

आमगुळे (रानमेवा) खाण्याचे परंपरागत व आरोग्यदायी फायदे आमगुळे चवीला आंबट-तुरट असल्याने लाळ व पाचक रसांची निर्मिती वाढते, त्यामुळे भूक लागते व पचन सुधारते. उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत होते. त्यामुळे ग्रामीण भागात हा रानमेवा आवडीने खाल्ला जातो.

तोंडाची चव सुधारते, रानात नैसर्गिकरीत्या उगवलेले असल्याने त्यात सूक्ष्म पोषक घटक असतात. आदिवासी समाजात आमगुळे थकवा कमी करण्यासाठी व शरीर ताजेतवाने ठेवण्यासाठी खाल्ले जाते. आमगुळे मर्यादित प्रमाणातच खावीत. गर्भवती महिला किंवा पचनाच्या गंभीर तक्रारी असतील तर सेवन टाळावे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें