घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

लोककलावंतांचा आम्हास अभिमान – उल्हास पवार

लोककलांना एक समृद्ध इतिहास आहे. या लोककलेची उपासना करणाऱ्या सर्व लोककलावंतांचा आम्हाला अभिमान आहे. पारंपरिक लावणी आणि लोककला महोत्सवाच्या माध्यमातून ही अस्सल लोककला लोकांपर्यंत पोहोचत आहे.ही लोककला अधिक वृद्धिंगत व्हावी, अशा सदिच्छा ज्येष्ठ विचारवंत व माजी आमदार उल्हास पवार यांनी व्यक्त केल्या.

पठ्ठे बापूराव प्रतिष्ठान व सांस्कृतिक कला मंडळाच्या वतीने देण्यात येणाऱ्या शाहीर पठ्ठे बापूराव आणि इतर पुरस्कारांचे वितरण महात्मा फुले सांस्कृतिक भवन, वानवडी येथे उल्हास पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

ज्येष्ठ ढोलकी वादक पांडुरंग घोटकर गुरुजी यांना शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारामध्ये 21 हजार रुपये रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह देण्यात आले. तसेच लावणी नृत्यांगना प्रमिला लोदगेकर यांना नामचंद पवळा पुरस्कार, तर शाहीर आप्पासाहेब उगले यांना तमाशा साहित्यिक बापूसाहेब जिंतीकर पुरस्कार देण्यात आला. या दोन्ही पुरस्कारांमध्ये प्रत्येकी 15 हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

हार्मोनियम वादक सुधीर जावळकर यांना शंकरराव घोटकर स्मृती सन्मान प्रदान करण्यात आला. तसेच राम, लखन आणि श्रीकृष्ण रेणुकर या मृदंग व तबला वादक कलावंतांना विशेष गुणगौरव स्मृतिचिन्ह देण्यात आले.उल्हास पवार यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त कलावंतांच्या वतीने त्यांना कलावंतांचे आश्रयदाते हे मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाला माजी महापौर व नगरसेवक प्रशांत जगताप, नगरसेविका उज्वला जंगले, नगरसेवक नितीन गावडे, शिवसेना जिल्हाप्रमुख उल्हास शेवाळे, नलिनी कुलकर्णी, छाया जिंतीकर, किरण जिंतीकर, केदार जिंतीकर, छाया कांबीकर, सुरेखा पवार, सुरेश घुले, जयप्रकाश वाघमारे, झांबरे, डॉ. शंतनू जगदाळे, बापू जगताप, रवींद्र चव्हाण, कृष्णा ढेरंगे, रेश्मा परितेकर, राम खोमणे, संदीप घुले, बाळासाहेब केमकर, प्रमोद रणनवरे आणि पप्पू बंड यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक झांबरे यांनी केले, आभार प्रदर्शन डॉ. जगदाळे यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रतिष्ठानचे सचिव दीपक वाघमारे यांनी केले.सणसवाडी, मोडनिंब, पुणे, जालना आणि अहिल्यानगर येथील कलावंतांनी या महोत्सवात गण, गवळण, मुजरा आणि लावणीचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.

यावेळी पुरस्कार स्वीकारताना ज्येष्ठ ढोलकी वादक पांडुरंग घोटकर गुरुजी भावूक झाले. त्यांनी सांगितले की, आयुष्यभर या लोककलेची सेवा केली आहे. माझा शेवटचा श्वासही रसिकांसमोर ही लोककला सादर करतानाच व्हावा, अशी माझी इच्छा आहे. ढोलकी वादनाच्या माध्यमातून मी आयुष्यभर रसिकांची सेवा केली असून शेवटच्या श्वासापर्यंत ही सेवा करत राहणार, असे त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत सांगितले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें