घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

सायकल स्पर्धेसाठी चकाचक केलेले रस्ते महिन्याभरात खचले

पुणे महापालिकेने आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी तब्बल १४५ कोटी रुपये खर्च करून रस्ते डांबरीकरण, चेंबर समपातळीत आणण्याचे काम केले, पण आता एक महिना पूर्ण होत असतानाच चेंबर खचायला सुरुवात झाली आहे.

त्यामुळे एवढा मोठा खर्च करून ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्याने पुन्हा दुरुस्तीची नामुष्की ओढवली आहे. महापालिका प्रशासन हे चेंबर पुन्हा दुरुस्त करणार असले तरी ठेकेदाराच्या चौकशीला मात्र टाळाटाळ केली जात आहे.

पुण्यात जानेवारी महिन्यात आंतरराष्ट्रीय दर्जाची ‘पुणे ग्रँड टूर’ सायकल स्पर्धा झाली. या स्पर्धेला पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी महापालिकेने ७५ किलोमीटरचे रस्ते चकाचक केले. रस्त्यातील ओबडधोबड पॅचवर्क गायब झाले, रस्त्यांवर पांढरे पट्टे, झेब्रा क्रॉसिंग, रंगवलेले पादचारी मार्ग आणि दुभाजकांमुळे रस्ते सुंदर झाले. प्रवासातील त्रास दूर झाल्याने पुणेकरांनी महापालिकेच्या या कामाचे कौतुक केले.

महापालिकेने ७५ किलोमीटरच्या कामासाठी तब्बल १४५ कोटी रुपये मोजले आहेत, मात्र सायकल स्पर्धेसाठी हे काम अतिशय महत्त्वाचे असल्याने व काम दर्जेदार झाले पाहिजे असा आग्रह असल्याने त्यावर कोणीही प्रश्न उपस्थित केले नाहीत, तसेच अत्यावश्यक कामे म्हणून महापालिकेने विनानिविदा सुमारे १५ कोटी रुपये खर्च करून रस्त्यांवरील चेंबर उचलण्याची कामे केली.

महापालिकेने केलेले रस्ते आणि चेंबर खराब होणार नाहीत. उलट पुढच्या वर्षभरात शहरातील अन्य रस्ते व सुमारे १५०० चेंबर दुरुस्त केले जाणार आहेत, असा दावा केला आहे. याप्रकरणी दीपक वाघमारे, विवेक वेलणकर यांनी महापालिका प्रशासनाकडे तक्रार केली असून, सायकल स्पर्धेनिमित्त केलेली चेंबर दुरुस्ती निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप केला आहे, तसेच याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.

सायकल स्पर्धा मार्गावरील चेंबर खचल्याचे समोर आले आहे. ज्या ठिकाणी काम निकृष्ट झाले आहे. ते पुन्हा त्याच ठेकेदाराकडून दुरुस्त केले जातील. ही जबाबदारी त्या ठेकेदाराची आहे, तसेच भविष्यात १५०० चेंबर दुरुस्त केले जाणार आहेत. त्यावेळीही काळजी घेतली जाईल. चेंबर खराब झाल्याची चौकशी केली जाणार नाही.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें