घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

ओसवाल बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याने ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

येथील बाणेर भागात विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीच्या व्यवहारात फसवणूक झाल्याने एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याने नियोजित गृहप्रकल्पातून उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी ज्येष्ठाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून दोन बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नरेश उमाकांत महाजन (वय ६९, रा. अंबरनाथ पूर्व, जि. ठाणे) असे आत्महत्या केलेल्या ज्येष्ठाचे नाव आहे. त्यांचा मुलगा मयूर नरेश महाजन (वय ४१, रा. अंबरनाथ पूर्व, जि. ठाणे) यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार, बांधकाम व्यावसायिक जयंतीलाल ताराचंद ओसवाल (वय ५६) आणि रिषभ ओसवाल (वय ३०, दोघे रा. भवानी पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेश महाजन हे महावितरणमध्ये अधिकारी होते. त्यांनी बाणेर येथे एक जागा घेतली होती, जी त्यांनी ‘स्विटी असोसिएटस’चे जयंतीलाल ओसवाल यांना विकसित करण्यासाठी दिली होती. करारानुसार, विकसित केलेल्या जागेवर त्यांना सदनिका मिळणार होती. मात्र, ओसवाल यांनी कराराचे पालन केले नाही आणि त्यांना सदनिका दिली नाही. यामुळे महाजन नैराश्यात होते.

महाजन यांच्या जागेवर सात मजली गृहप्रकल्प साकारण्यात आला असून, त्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे. १६ फेब्रुवारी रोजी महाजन बाणेर येथील या गृहप्रकल्पाच्या आवारात आले. त्यांनी कराराप्रमाणे सदनिका देण्याबाबत ओसवाल यांच्याकडे विचारणा केली. त्यावेळी बांधकाम व्यावसायिकांनी त्यांना मानसिक त्रास देऊन धमकावले, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या घटनेनंतर नरेश महाजन यांनी नियोजित गृहप्रकल्पाच्या सातव्या मजल्यावर जाऊन तेथून उडी मारून आत्महत्या केली. मयूर महाजन यांच्या फिर्यादीनुसार, बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक अनिल केकाण या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें