घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

औंध – बोपोडी प्रभागातील महत्त्वाच्या प्रकल्पांना आयुक्तांची भेट

पुणे महानगरपालिकाचे आयुक्त नवल किशोर राम यांनी उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या विनंतीवरून आज औंध-बोपोडी प्रभागातील विविध रखडलेल्या विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी सर्व प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

या पाहणी दौऱ्यात उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्यासह स्थानिक नगरसेवक सनी निम्हण, नगरसेविका सपना छाजेड, नगरसेविका भक्ती गायकवाड, तसेच आरपीआयचे शिवाजीनगर मतदारसंघ अध्यक्ष अविनाश कदम, ज्ञानेश्वर जाविर व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या भेटीबाबत माहिती देताना उपमहापौर परशुराम वाडेकर म्हणाले की, प्रभागातील महत्त्वाच्या विकासकामांसाठी आयुक्तांकडे मागील अनेक दिवसांपासून वेळ मागण्यात येत होता. मात्र काल आयुक्तांनी स्वतःहून प्रभागाला भेट देण्याची तयारी दर्शवत, नागरिकांच्या प्रश्नांची प्रत्यक्ष पाहणी करण्याची इच्छा व्यक्त केली.

त्यानुसार आज सकाळी ११ वाजता आयुक्तांनी प्रभागातील महत्त्वाच्या प्रकल्पांना भेट दिली.या दौऱ्यात तथागत भगवान गौतम बुद्ध विपश्यना विहार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका व ग्रंथालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉकी स्टेडियम (चिखलवाडी) तसेच हरीश ब्रिज शेजारील मोकळे पटांगण या ठिकाणांची पाहणी करण्यात आली.

यावेळी महापालिकेच्या सर्व संबंधित खात्यांचे खातेप्रमुख उपस्थित होते.आयुक्त नवल किशोर राम यांनी विपश्यना विहार व हॉकी स्टेडियमच्या प्रलंबित कामांचा आढावा घेत, ही कामे कोणताही विलंब न लावता तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जागेवरच दिले. तसेच हरीश ब्रिजलगत असलेल्या मोकळ्या पटांगणाच्या ठिकाणी नागरिकांसाठी सुसज्ज उद्यान (गार्डन) विकसित करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

या प्रत्यक्ष पाहणीमुळे औंध-बोपोडी प्रभागातील रखडलेले व महत्त्वाचे प्रकल्प आता वेगाने मार्गी लागतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. आयुक्तांच्या या सकारात्मक भूमिकेबद्दल उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी त्यांचा सन्मान करून वेळ दिल्याबद्दल आभार मानले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें