घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाला १ हजार कोटींचा फटका

भूमिअभिलेख विभागाने वहिवाटीची मोजणी बंद केल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांनी तात्पुरते रेखांकन करून देण्याचे निर्देश दिले आहेत; पण तात्पुरते रेखांकन करणे ही पालिकेची जबाबदारी नाही, अशा स्वरूपाच्या मोजण्या भूमिअभिलेख विभागाकडून नाकारल्या जात आहेत.

त्यामुळे पुणे महापालिकेकडे परवानगीसाठी येणाऱ्या बांधकाम प्रकल्पांच्या संख्येत घट झाली आहे. त्याचा परिणाम पालिकेच्या बांधकाम विभागाच्या उत्पन्नाला सुमारे १ हजार कोटींना फटका बसला आहे.

पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ आणि एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली अर्थात यूडीसीपीआरनुसार कोणताही विकास करण्यापूर्वी सक्षम प्राधिकरणाची परवानगी घेणे आवश्यक आहे. शहरांच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर जमिनीचे तुकडे पाडले जातात, तसेच वहिवाटींची मोजणी करून त्याआधारे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये संस्थांकडून बांधकाम परवानगी घेतली जाते.

यातून बेकायदेशीर खरेदी-विक्रीचे व्यवहार आणि अनधिकृत इमारती तयार होण्याचे प्रमाण वाढत आहे. हे टाळण्यासाठी भूमिअभिलेख विभागाने महापालिका, नगरपालिका, तसेच स्थानिक नियोजन प्राधिकरणाकडून तात्पुरते रेखांकन मंजूर करणे बंधनकारक केले आहे. हे रोखण्यासाठी तत्कालीन भूमिअभिलेख संचालक डॉ. सुहास दिवसे यांनी यासंदर्भात परिपत्रक जारी केले होते; पण तात्पुरते रेखांकन करणे ही पालिकेची जबाबदारी नाही.

त्यामुळे पुणे महापालिकेने तात्पुरते रेखांकन करण्यास नकार दिला. त्यामुळे अशा स्वरूपाच्या मोजण्या भूमिअभिलेख विभागाकडून नाकारल्या जात आहेत. त्यामुळे पुणे महापालिकेकडे परवानगीसाठी येणाऱ्या बांधकाम प्रकल्पांच्या संख्येत घट झाली आहे. त्याचा परिणाम पालिकेच्या बांधकाम विभागाच्या उत्पन्नाला सुमारे १ हजार कोटींना फटका बसला आहे. त्यामुळे तात्पुरते रेखांकनाबाबत तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें