घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

पुण्यात 75 हजार नागरिकांना उच्च रक्तदाब

महापालिकेतर्फे शहरात राबवण्यात येत असलेल्या असंसर्गजन्य आजार प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत गेल्या सात महिन्यांत तब्बल 75 हजारांहून अधिक नागरिकांमध्ये उच्च रक्तदाबाचा (हायपरटेन्शन) त्रास आढळून आला आहे.

शहरात 1 एप्रिल 2025 ते 13 फेबुवारी 2026 या कालावधीत महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत ही तपासणी करण्यात आली.

शहरात 30 वर्षांवरील सुमारे 17 लाख 89 हजार 159 नागरिक आहेत. त्यापैकी महापालिकेच्या 19 शहरी आरोग्य केंद्रे, 45 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि दवाखान्यांअंतर्गत 8 लाख 36 हजार नागरिकांची उच्च रक्तदाबासाठी तपासणी करण्यात आली. त्यापैकी 75 हजार 148 नागरिकांमध्ये उच्च रक्तदाबाचे निदान झाले आहे. महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये नागरिकांची तपासणी होत असून, एनसीडी पोर्टलवर नोंद केली जात आहे. त्यामुळे तपासणी, निदान, उपचार व फॉलोअपची डिजिटल नोंद यासाठी कमी वेळ लागत आहे.

उच्च रक्तदाबाबरोबरच मधुमेह, तोंडाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशय मुखाच्या कर्करोगासाठीही नागरिकांची तपासणी सुरू आहे. तपासणीत संशयित आढळलेल्या रुग्णांना पुढील निदान व उपचारांसाठी शासकीय रुग्णालयांमध्ये संदर्भित करण्यात येत आहे. आरोग्य विभागाने नागरिकांना नियमित तपासणी करून घेण्याचे, आहार आणि जीवनशैलीत बदल करण्याचे आवाहन केले आहे. वेळेवर निदान आणि उपचार झाल्यास उच्च रक्तदाबासारखे असंसर्गजन्य आजार नियंत्रणात ठेवणे शक्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

मधुमेह रुग्णांची सद्य:स्थिती

कालावधी : 1 एप्रिल 2025 ते 13 फेबुवारी 2026

30 वर्षांवरील लोकसंख्या : 17,89,159

मधुमेहासाठी तपासणी : 7,65,051 नागरिक

निदान झालेले रुग्ण : 44,101

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें