घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

बाह्यवळण मार्गावर बसवर आदळून ट्रक चालकाचा मृत्यू

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर दरी पूल परिसरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसवर ट्रक आदळून ट्रक चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातात बसमधील प्रवासी जखमी झाले.हुसेन अब्बास सय्यद (वय ५५, रा.शिरा टाऊन, मंगळापेठ, कर्नाटक ) असे मृत्युमुखी पडलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे.

याबाबत प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसचा चालक प्रविण दत्तात्रय कांबळे (वय ३१, रा. शेळेवाडी, ता. राधानगरी, कोल्हापूर) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून प्रवासी वाहतूक करणारी खासगी आराम बस मंगळवारी (२४ फेब्रुवारी) पहाटे साडेतीनच्या सुमारास कोल्हापुरकडे निघाली होती.

मुंबई-बंगळुरु बाह्यवळण मार्गावर दरीपुलाजवळ भरधाव ट्रकने बसला पाठीमागून धडक दिली. अपघातात ट्रक चालक सय्यद गंभीर जखमी झाला. अपघातात ट्रकच्या दर्शनी भागाचे, तसेच बसचे नुकसान झाले. अपघातात बसमधील काही प्रवाशांना दुखापत झाली.अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी घटनास्थळी भेट दिली.

पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रक क्रेनच्य सहायाने बाजूला नेला. अपघातात गंभीर जखमी झालेला ट्रक चालक सय्यद याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. अपघातात किरकोळ जखमी झालेल्या बसमधील प्रवाशांवर उपचार करण्यात आले. अपघातास जबाबदार ठरल्या प्रकरणी ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक डोईफोडे तपास करत आहेत.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें