घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

परीक्षा देऊन बाहेर आलेल्या विद्यार्थ्यावर कोयत्याने वार; पुण्यातील धक्कादायक घटना

बारावीची परीक्षा देऊन बाहेर पडलेल्या एका विद्यार्थ्यावर कोयत्याने वार केल्याची घटना कोथरूडमधील एका महाविद्यालयाच्या परिसरात मंगळवारी दुपारी घडली. या प्रकरणी कोथरूडपोलिसांनी तीन अल्पवयीनांना ताब्यात घेतले आहे.

हल्ल्यात जखमी झालेला १८ वर्षीय विद्यार्थी आणि अल्पवयीन आरोपी हे वारजे भागातील एका शाळेत शिक्षण घेत होते. दहावीत असताना त्यांच्यात वाद झाला होता.

जखमी विद्यार्थी मंगळवारी दुपारी कोथरूड भागातील एका महाविद्यालयात बारावीची परीक्षा देण्यासाठी आला होता. त्यावेळी त्याला आरोपींनी गाठले आणि शिवीगाळ करून त्याच्यावर कोयत्याने वार केले. या घटनेत तो किरकोळ जखमी झाला, अशी माहिती परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली.

घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप देशमाने यांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्लेखोर अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून कोयता जप्त केला आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें